Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिग्पाल लांजेकरांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाची भुरळ योगी आदित्यनाथ यांना… ट्रेलर पाहून म्हणाले, “यह तो….”

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोमवारी लखनऊ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय आस्थेने त्यांची चौकशी केली.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 01, 2025 | 06:25 PM
दिग्पाल लांजेकरांच्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाची भुरळ योगी आदित्यनाथ यांना… ट्रेलर पाहून म्हणाले, “यह तो….”
Follow Us
Close
Follow Us:

शिवप्रेमींमध्ये ‘शिवराज अष्टक’ चित्रपटामुळे चर्चेत राहिलेले दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून दिग्दर्शक चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. आशयघन चित्रपटाच्या माध्यमातून आणि चित्रपटाच्या कथानकातून दिग्दर्शकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आपल्या उत्तमोत्तम चित्रपटांतून लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपली वेगळी छाप निश्चितच उमटवली आहे. ‘शिवराज अष्टक’ नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. नुकतीच त्यांनी एक खास पोस्ट सोशल माध्यमांवर शेअर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

४ महिन्यांनंतर अभिनेत्री श्रद्धा आर्याने शेअर केला जुळ्या बाळांचा फोटो, Ghibli Photo शेअर करत नावही केले रिव्हिल

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोमवारी (३१ मार्च २०२५) लखनऊ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय आस्थेने त्यांची चौकशी केली. तर आपल्या आगामी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे खास निमंत्रण दिग्पाल लांजेकर यांनी योगी आदित्यनाथ यांना दिले. या भेटीत इतिहास, कला, संस्कृती अशा विषयांवर दोघांमध्ये मनसोक्त गप्पा झाल्या. भेटीदरम्यान, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांसोबत अभिनेता अजय पूरकर, आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ देखील उपस्थित होते. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाविषयी जाणून घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले. येत्या १८ एप्रिलला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीची रितेश देशमुख- अजय देवगणच्या ‘रेड २’मध्ये एन्ट्री, यो यो हनी सिंगसोबत देणार जबरदस्त ठुमके…

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर शेअर केलेल्या पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा किस्सा सांगताना म्हणतात, “दि. ३० मार्च २०२५ , आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांचा फोन आला. योगींना भेटायचे आहे. म्हटले “सांगा कुठे येऊ ?” ते म्हणाले “योगी म्हणजे मी नव्हे! योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री.” मी तातडीने होकार भरला आणि अजय दादा (पुरकर)ला सोबत घेऊन लखनौला पोचलो. दि. ३१ ची सकाळी ११: १५ची भेटीची वेळ मिळाली होती आणि केवळ ५ मिनिटासाठी मिळाली होती. अनेक विचार डोक्यात घेऊन लखनौच्या मुख्यमंत्री आवासात पोचलो आणि गेल्या गेल्या कळले की, दिवसाभरातली आमचीच पहिली भेट आहे. काही काळ निरंजन नाथांशी अन्य विषयावर बोलणे झाल्यावर माझ्याकडे योगी आदित्यनाथांनी सहज हसून पाहिले आणि चौकशी केली. ज्ञानोबारायांचे स्मरण करून त्यांना “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” सिनेमाबद्दल सांगायला सुरुवात केली. पोस्टरपुढे करत म्हणालो “आता महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सिनेमा बनवत आहे. संत ज्ञानेश्वरांची…” इतक्यात समोरून ते उदगारले “मुक्ताई !… अर्थात उनकी छोटी मातृतुल्य बहन!” मी आणि अजय दादाने विस्मयाने एकमेकांकडे पाहिले. तोवर “आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा…” ही ओवी त्यांनी आम्हाला ऐकवली आणि म्हणाले की, “इतिहासाशी प्रतारणा ना करता हे सगळं दाखवायची इच्छा आणि प्रामाणिकपणा पाहिजे” त्यावर जरा धीर करून मी म्हटलं की “एक कच्चा ट्रेलर आम्ही सोबत आणला आहे. अनुमती असेल तर दाखवतो.” त्यांनी क्षणाचाही विलंब ना करता दाखवा म्हटलं. अतिशय श्रद्धेनं त्यांनी ट्रेलर पूर्ण पाहिला. चित्रपटातील ज्ञानेश्वर माउली मुक्ताबाईंना कुंडलिनी अभ्यास शिकवतात, मुक्ताई मातेचे अध्यात्मातील अधिकार दाखवणारे प्रसंग, नाथसंप्रदायाचा इतिहास अशा प्रसंगांवर दाद दिली. त्यानंतर ज्या नाथ संप्रदायाचे ते पाईक आहेत, तो नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा अलौकिक संबंध, त्या सगळ्या क्रांतीत या चारही भावंडांचं योगदान यावर भरभरून बोलले. समोर बसलेली व्यक्ती एक अभ्यासू साधक आहे , हे क्षणाक्षणाला जाणवत होतं. भेटीअंती आवर्जून म्हणाले “यह निर्मिती तो अत्यन्त सुंदर हुई है… इसी तरह से धर्म और भारतीय तत्वज्ञान के प्रति प्रामाणिकता से कार्य करते रहो. इस प्रकार संतों के कार्य दिखाने वाली और भी फिल्मे बनाइये । आपका कल्याण हो।” परतताना मनात केवळ हेच येत होत “सगळं माऊलींचं आहे, मुक्ताईच आहे… माझे केवळ पाईकपण ” ।।राम कृष्ण हरी ।। ”

‘पुष्पा’फेम अल्लू अर्जुन बदलणार स्वत:चं नाव! नेमकं कारण काय ?

Web Title: Director digpal lanjekar meet up cm yogi adityanath on the occasion of the film sant dnyaneshwaranchi muktai shared post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 06:25 PM

Topics:  

  • CM Yogi Adityanath
  • Film Director
  • marathi movie

संबंधित बातम्या

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह
1

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
2

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
3

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
4

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.