अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘Raid’ चित्रपटाचा सिक्वेल येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘Raid 2’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता, ज्यामध्ये अजय पुन्हा एकदा आयआरएस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसला होता. यावेळी त्याचा सामना खलनायक दादाभाई उर्फ रितेश देशमुखसोबत होणार आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर आता चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची कमालीची उत्सुकता आहे. सध्या सोशल मीडियावर अजय देवगणच्या ह्या बहुप्रतिक्षित चित्रपटाची जोरदार चर्चा होत असताना, नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार ‘रेड २’मध्ये बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कोण आहे ती अभिनेत्री, जाणून घेऊया…
‘स्त्री २’ चित्रपटातील ‘आज की रात’ गाण्यामध्ये एका पेक्षा एक अफलातून हुकस्टेप करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली तमन्ना भाटिया आता ‘रेड २’ चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्त्री २’मधील आयटम साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तमन्ना भाटिया आता लवकरच ‘रेड २’ चित्रपटातल्या आयटम साँगमधूनही ती आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पीपिंगमूनने दिलेल्या वृत्तानुसार, तमन्ना भाटियाची ‘रेड २’ चित्रपटामध्ये एका खास गाण्यासाठी निवड करण्यात आली आहे. चित्रपटातील आयटम साँगसाठी तमन्ना भाटिया गायक रॅपर यो यो हनी सिंग सोबत दिसणार आहे. तमन्ना आणि हनी सिंगचं गाणं एक प्रमोशनल साँग असून चित्रपटाच्या शेवटी हे गाणं प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मुंबईत ३ आणि ४ मार्चला एका स्टूडिओत या गाण्याचं शूटिंग करण्यात येणार आहे.
‘पुष्पा’फेम अल्लू अर्जुन बदलणार स्वत:चं नाव! नेमकं कारण काय ?
‘स्त्री २’ मधील ‘आज की रात’ गाण्याचे कोरिओग्राफर विजय गांगुली यांच्या दिग्दर्शनाखाली, हे गाणे दोन दिवसांत शुट केले जाईल. गाण्यासाठी चाहते आतुर आहेत. गाण्यात अजय देवगण आणि तमन्ना एकत्र दिसणार नसले तरी ते दोघेही जगन शक्ती दिग्दर्शित ‘रेंजर’ चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. तमन्ना भाटियाच्या एन्ट्रीने ‘रेड २’ला चार चाँद लागणार यात शंका नाही. गेल्या वर्षी ‘स्त्री २’ सिनेमात ‘आज की रात’ या गाण्यावर तमन्नाने केलेला डान्स चांगलाच गाजला. त्यामुळे ‘रेड २’मध्ये तमन्नाच्या अदा पाहायला तिचे चाहते उत्सुक असतील.
‘बंजारा’ सिनेमाची रिलीज होण्याआधीच चर्चा, सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट…
दिग्दर्शक राज कुमार गुप्ता आणि लेखक रितेश शाह, करण व्यास आणि जयदीप यादव यांच्या टीमकडून चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची खूपच उत्सुकता ताणून धरली आहे. दादाभाईच्या घरी अमय पटनायक यांनी टाकलेली ही ७५ वा ‘रेड’ असणार आहे. Raid 2 मध्ये सुरभ शुक्ला पुन्हा एकदा भयानक डॉन तौजीची भूमिका साकारत आहे. ‘रेड २’ सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून हा सिनेमा १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे. चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, सौरभ शुक्ला यांच्यासह वाणी कपूर, रजत कपूर, सुप्रिया पाठक, अमित सियाल आणि यशपाल शर्मा या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.