Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूड गाजवणारा अवलिया भूषण पटेलचं मराठी फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू, ‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण

‘१९२० इव्हल रिटर्न’, ‘रागिणी एमएमएस २’ आणि ‘अलोन’ यांसारख्या सुपरहिट हॉरर-थ्रिलर चित्रपटांच्या यशस्वी दिग्दर्शनानंतर भूषण पटेल यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘पी.एस.आय.अर्जुन’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 19, 2025 | 04:48 PM
बॉलिवूड गाजवणारा अवलिया भूषण पटेलचं मराठी फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू, 'या' चित्रपटातून करणार पदार्पण

बॉलिवूड गाजवणारा अवलिया भूषण पटेलचं मराठी फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू, 'या' चित्रपटातून करणार पदार्पण

Follow Us
Close
Follow Us:

‘१९२० इव्हल रिटर्न’, ‘रागिणी एमएमएस २’ आणि ‘अलोन’ यांसारख्या सुपरहिट हॉरर-थ्रिलर चित्रपटांच्या यशस्वी दिग्दर्शनानंतर भूषण पटेल यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘पी.एस.आय.अर्जुन’ हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. त्यांच्या या चित्रपटात महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने मुख्य भूमिका साकारली असून डॅशिंग लूकमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे दमदार डायलॉग्स सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडिंगमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी ‘पी.एस.आय.अर्जुन’ची छोटीशी झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली, ती पाहून या चित्रपटात बॉलिवूडचा टच असल्याचे दिसतेय. भूषण पटेल यांची बॉलिवूडमधील चित्रपटांची खासियत पाहाता ‘पी.एस.आय.अर्जुन’मध्येही काहीतरी रहस्यमय पाहायला मिळणार, हे नक्की !

२० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत ‘ज्वेल थीफ’ चित्रपटातील ‘या’ गाण्यात करणार रोमान्स, होतेय गाण्याची जोरदार चर्चा

दिग्दर्शक मराठीतील पदार्पणाबद्दल भूषण पटेल म्हणतात, “” मी स्वतःला अमराठी समजतच नाही. माझा जन्म मुंबईमध्ये झाल्यामुळे मराठी भाषा माझ्या खूप जवळची आहे. मी मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेण्यामागचे मुख्य कारण असे की, कथाकथन ही एक वैश्विक भाषा आहे. ‘पी. एस.आय.अर्जुन’ या चित्रपटाची कथा ऐकताच या चित्रपटाकडे मी आकर्षित झालो. ही फक्त क्राईम थ्रिलरची संकल्पना नाही तर पात्रांचे क्लिष्ट मानसशास्त्र, नैतिक गुंतागुंत आणि कथन या सगळ्याच गोष्टी उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. एक दिग्दर्शक म्हणून मला नेहमीच असे कथानक आवडते, जे प्रेक्षकांना स्पष्टपणे विचार करण्याचे आणि नवीन काही अनुभवण्याचे आव्हान देतात. त्यात सुपरस्टार अंकुश चौधरीसह मराठीतील अनेक मान्यवर कलाकार आहेत. मराठी कलाकारांसोबत काम करणे, हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात चांगला अनुभव होता. मराठी कलाकार ज्याप्रकारे भूमिका साकारतात ते अतिशय प्रेरणादायी आहे. ते पात्रांना जिवंत करतात. यात सर्व कलाकारांनी उत्तम काम केले असून अशा प्रतिभावान कलाकारांसोबत काम करणे ही एक माझ्यासाठी सुवर्णसंधी होती.”

Arshad Warsi Bday: २१ वर्षांपूर्वी… अभिनेत्याने बदलले पात्राचे नाव, मिळवली प्रसिद्धी; जाणून घ्या रंजक किस्सा!

बॉलिवूड आणि मराठी चित्रपटातील फरकाबद्दल दिग्दर्शक भूषण पटेल म्हणतात, ” मराठी आणि हिंदीमध्ये दिग्दर्शन करताना मला अतिशय वेगळे अनुभव आले. ते दोन्ही त्यांच्या स्वत: च्या जागी प्रगल्भ आहेत. मराठी सिनेमाला एक वेगळी सत्यता आहे. चित्रपटाची कथा अनेकदा सांस्कृतिक आणि भावनिक बारकावे, भाषेची लय या गोष्टींवर आधारित असते. तर हिंदी चित्रपट अनेकदा व्यापक आणि मुख्य प्रवाहात आकर्षण करणारे असतात. इथे जीवनापेक्षा मोठ्या कथा, नाट्यमय क्षण आणि भावनांवर भर दिला जातो. दोन्ही भाषा भावनिक सत्याची मागणी करतात, परंतु मराठीत कमी बोलून आपण जास्त व्यक्त होऊ शकतो. मराठी चित्रपटसृष्टीला कथाकथनाची समृद्ध परंपरा आहे.”

व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित, विक्रम शंकर प्रस्तुत ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Famous bollywood director bhushan patel debut marathi film industry in psi arjun marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • Ankush Choudhary
  • Bollywood
  • bollywood movies
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘या’ कलाकाराने स्वतः ठरवली जन्माची तारीख,दसऱ्याशी खास नातं; ८ वर्षांपूर्वीच घेतला जगाचा निरोप!
1

‘या’ कलाकाराने स्वतः ठरवली जन्माची तारीख,दसऱ्याशी खास नातं; ८ वर्षांपूर्वीच घेतला जगाचा निरोप!

डोक्यावर मुकुट, अंगभर सोन्याचे दागिने… सोनाक्षी सिन्हा कशी बनली ‘जटाधारा’मधील धन पिशाचिनी?
2

डोक्यावर मुकुट, अंगभर सोन्याचे दागिने… सोनाक्षी सिन्हा कशी बनली ‘जटाधारा’मधील धन पिशाचिनी?

२०२५ चा सर्वात मोठा अ‍ॅक्शन मसाला चित्रपट; एजंट चिंग्स’ट्रेलरने चाहत्यांना घातली भुरळ !
3

२०२५ चा सर्वात मोठा अ‍ॅक्शन मसाला चित्रपट; एजंट चिंग्स’ट्रेलरने चाहत्यांना घातली भुरळ !

SRK Birthday Special: शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त PVR INOX कडून खास सन्मान; ‘जवान’सह ब्लॉकबस्टर चित्रपटांचा महोत्सव
4

SRK Birthday Special: शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त PVR INOX कडून खास सन्मान; ‘जवान’सह ब्लॉकबस्टर चित्रपटांचा महोत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.