Rahul Deshpande Divorce: मनोरंजन क्षेत्रातून एक मोठी बातमी येत आहे. मराठी संगीत क्षेत्रात मोठे नाव असणाऱ्या राहुल देशपांडे यांनी आपल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला आहे. राहुल देशपांडे आणि त्यांची पत्नी नेहा यांनी 17 वर्षांच्या संसारातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल देशपांडे यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी सोशल मिडियावर घटस्फोट घेतल्याची पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राहुल देशपांडे आणि त्यांची पत्नी नेहा हे कायदेशीररित्या गेल्या वर्षीच वेगळे झाल्याचे त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे. दरम्यान राहुल देशपांडे यांनी घटस्फोट घेतल्याची बातमी जवळपास एक वर्षाने आपल्या चाहत्यांना दिली आहे.
राहुल देशपांडेंची पोस्ट काय?
मी आज तुम्हाला काही सांगू इच्छितो. काही लोकांना मी याआधीच माहिती शेअर केली आहेच. मी आणि नेहा 17 वर्षांच्या आठवणीनंतर परस्पर सहमतीने वेगळे होत आहोत. यापुढे आम्ही आमचे आयुष्य स्वतंत्रपणे जगणार आहोत. सप्टेंबर 2024 मध्ये आम्ही कायदेशीररित्या वेगळे झालो आहोत.
मी ही माहिती देण्याआधी थोडा वेळ घेतला. जेणेकरून हे मला स्वीकारता येईल. खास करून आमची मुलगी रेणुका हिच्या दृष्टीने. टी माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे. वैयक्तिकरित्या आमच्यासाठी एक नवीन प्रवास सुरू होत आहे. मात्र आई-वडील म्हणून आमचा एकमेकांबद्दलचा आदर असाच कायम असेल.
अनेक वर्ष संसारानंतर घटस्फोट घेणंं का होतंय नॉर्मल?
बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या त्याची प्रेयसी गौरीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे पण 2021 मध्ये त्याने किरण रावकडून ग्रे डिव्हॉर्स घेतला. काही काळापूर्वी ए.आर. रहमानचा ग्रे डिव्हॉर्सही चर्चेत होता. त्याने त्याचे २९ वर्षांचे बायकोशी असणारे नातं संपवलं. ५० वर्षांच्या वयानंतर घटस्फोट घेतलेले अनेक सेलिब्रिटी आहेत. भारतासह जगभरात ग्रे डिव्हॉर्सची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. केवळ सेलिब्रिटीच नाही तर सामान्य माणसांमध्येही हे प्रमाण वाढत असलेले दिसत आहे. पण ग्रे डिव्हॉर्स म्हणजे नेमके काय याबाबत आपण अधिक माहिती.
ग्रे डिव्हॉर्स म्हणजे काय
ग्रे डिव्हॉर्स हा शब्द पहिल्यांदा २००४ मध्ये अमेरिकेत वापरण्यात आला. याचा अर्थ ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या दीर्घकालीन विवाहा संपुष्टात आणणे. त्याला ‘Middle Age Split’ किंवा ‘Late In Life Divorce’ असेही म्हणतात. हा वयाचा एक टप्पा असतो जेव्हा मुले मोठी होतात, त्यांचे करिअर सेटल होते, व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत असते आणि निवृत्त होणार असते किंवा आधीच ती घेत असते.