Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक कन्या दिनानिमित्त ‘आशा’ चित्रपटाची भव्य स्क्रीनिंग; डॉ. श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थिती!

जागतिक कन्या दिनानिमित्त मराठी चित्रपट “आशा” ची विशेष स्क्रीनिंग मुंबईत पार पडले. या कार्यक्रमासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली

  • By अमृता यादव
Updated On: Oct 11, 2025 | 03:26 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

महिलांच्या सामर्थ्याचा आणि आशा सेविकांच्या निःस्वार्थ कार्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा, दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी केलेल्या प्रयत्नाला जवळपास ५०० आशा आणि अंगणवाडी सेविकांनी भरभरून दाद दिली.

यावेळी निर्मात्या दैवता पाटील म्हणाल्या, “एखादी स्त्री जेव्हा घराच्या चौकटीबाहेर पाऊल टाकते, तेव्हा तिला असंख्य अडचणींना सामोरे जावं लागतं, कधी घराबाहेरचा विरोध, तर कधी घराच्या आतलाच संघर्ष. तरीही ती थांबत नाही. प्रत्येक अडथळा ओलांडत, ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत पुढे जाते. ‘आशा’ चित्रपटातील नायिकाही अशीच आहे, आशा सेविका म्हणून काम करत असली, तरी ती हे फक्त नोकरी म्हणून करत नाही, तर तिच्यासाठी ते एक आवड आणि ध्यास आहे. म्हणूनच तिची कहाणी ही फक्त एका आशा सेविकेची राहत नाही, तर ती प्रत्येक स्त्रीची कहाणी बनते… बाईपणाच्या संघर्षाची आणि सामर्थ्याची गोष्ट ठरते.”

“आशा” या चित्रपटाला ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री या विभागांत पारितोषिके मिळाली आहेत.आरोग्यसेविकांच्या सेवाभावावर आधारित हा चित्रपट महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि संघर्षाचा हृदयस्पर्शी प्रवास दाखवतो.

पुरस्कार विजेते दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले, “सध्या मराठी सिनेमा नव्या वाटा शोधत आहे. विविध आणि आशयपूर्ण विषयांवर चित्रपट निर्माण होत आहेत, आणि प्रेक्षकही या नव्या प्रवाहाला मनापासून दाद देत आहेत. एका शिबिरादरम्यान आशा सेविकांचं काम जवळून पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा मनात विचार आला, अरे, या कामामागचं जग किती मोठं आणि महत्त्वाचं आहे! यावर तर नक्कीच एक चित्रपट व्हायला हवा.ही खरं तर एका वेगळ्या जगाची गोष्ट आहे. आपल्या समाजातच राहणारा हा एक वर्ग पण ज्याच्या आयुष्याबद्दल, संघर्षाबद्दल आणि त्यागाबद्दल आपल्याला फारसं माहिती नसतं. ‘आशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर येणार आहे. ‘आशा’ हा सिनेमा फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाही, तर घर सांभाळून, स्वतःची ओळख शोधणाऱ्या, प्रसंगी त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आणि तिच्या न थकणाऱ्या प्रवासाचा आहे. मराठी प्रेक्षकांनी नेहमीच नव्या विषयांना आणि प्रामाणिक कथांना उघड मनाने स्वीकारलं आहे. म्हणूनच, ही वेगळी, अनोखी आणि भावस्पर्शी कहाणीही त्यांच्या मनाला नक्कीच भिडेल, असा विश्वास वाटतो.”

‘झी मराठी अवॉर्ड्स 2025’ ला भावनांचा महाउत्सव; लाडक्या जोड्यांचे मनमोहक परफॉर्मन्स!

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान केला. ह्यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, “चित्रपट हे समाजप्रबोधनाचं एक प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे. समाजातील विविध प्रश्न, भावना आणि संघर्ष जर चित्रपटाच्या माध्यमातून मांडले गेले, तर त्यातून दिला जाणारा संदेश नक्कीच लोकांच्या मनापर्यंत पोहोचतो. समाजात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद सिनेमात आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आशा’ हा चित्रपट. दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माते निलेश कुवर आणि दैवता पाटील यांनी समाजातील अत्यंत महत्त्वाचा पण आजवर दुर्लक्षित राहिलेला घटक आशा सेविका यांच्या जीवनावर हा चित्रपट साकारला आहे. आपल्या गावखेड्यात आरोग्यसेवा, जनजागृती आणि समाजहितासाठी अखंड झटणाऱ्या या महिलांची कहाणी पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. या सुंदर उपक्रमाबद्दल आणि संवेदनशील प्रयत्नाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक.”

अभय देओलच्या खासगी आयुष्याची चर्चा; विदेशी तरुणीसोबत फोटो व्हायरल, सनी देओलची खास कमेंट!

चित्रपटात मुख्य भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी रिंकू राजगुरू समवेत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, हर्षा गुप्ते, आणि दिलीप घारे यांचा समावेश आहे. चित्रपटाचे लेखन अंतरिक्ष श्रीवास्तव आणि दीपक पाटील यांनी केले आहे तर दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील सुरेश सारंगम यांनी कॅमेराची धुरा सांभाळली आहे.

Web Title: Grand screening of the film asha on the occasion of international day of the girl child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी
1

Palghar Election : निवडणूक जिंकून मनातला देशसेवेचा विचार पूर्ण करेन- करण तिवारी

”सासर नवऱ्याचं, माहेर भावाचं..”, सासुरवाशीण–माहेरवाशीणच्या चक्रात अडकलेल्या मुलींच्या वेदनेवर प्राजक्ता हनमघरचे थेट भाष्य
2

”सासर नवऱ्याचं, माहेर भावाचं..”, सासुरवाशीण–माहेरवाशीणच्या चक्रात अडकलेल्या मुलींच्या वेदनेवर प्राजक्ता हनमघरचे थेट भाष्य

कोकणातील ‘या’ गावात 1492 सालापासून ‘ही’ अनोखी परंपरा सुरु! पाठीवर तीक्ष्ण लोखंडी आकडे टोचून…
3

कोकणातील ‘या’ गावात 1492 सालापासून ‘ही’ अनोखी परंपरा सुरु! पाठीवर तीक्ष्ण लोखंडी आकडे टोचून…

Ratnagiri News : चिपळूण सायकलिंग क्लबच्या रायडर्सचा दबदबा; देशभरातून १५० सायकलस्वारांची झाली निवड
4

Ratnagiri News : चिपळूण सायकलिंग क्लबच्या रायडर्सचा दबदबा; देशभरातून १५० सायकलस्वारांची झाली निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.