(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलिवूडमधील अत्यंत निवडक आणि दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता अभय देओल सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.अभयने आतापर्यंत मोजकेच चित्रपट केले असले, तरी प्रत्येक भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. पण यावेळी तो त्याच्या कोणत्या नव्या प्रोजेक्टमुळे नाही, तर व्यक्तिगत नातेसंबंधांमुळे चर्चेत आहे. अभय देओलने नुकताच विदेशी तरुणीसोबतचा एक खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
या फोटोत त्याच्यासोबत एक विदेशी तरूणी दिसत आहे. या फोटोमध्ये दोघंही एकमेकांच्या खूप जवळ असल्याचं दिसत असून, या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याचं रिलेशनशिप सुरू असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सोशल मीडियावर याची चर्चा चांगलीच रंगली आहे. या व्हायरल फोटोमध्ये दोघे ही कोजी मूडमध्ये दिसत आहेत. हा फोटो पाहून त्यांच या विदेशी तरूणीसोबत अफेयर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र या दोघांपैकी एकानेही या नात्याला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. या विदेशी तरुणीचं नाव अमांडा पाल्मर असून, ती एक स्वतंत्र कलाकार आहे.तसंच, ती सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी एक नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन देखील चालवते.
Bigg Boss 19 : तान्या अमालच्या प्रेमात? फोटोला केली किस…मालतीने केले आरोप, Video Viral
Bigg Boss 19 : घरातल्या या मास्टरमाइंडला काढले बाहेर! या 5 खेळाडूंना बसला फटका, तान्याला झाला आनंद
आता या पोस्टवर अभयचा मोठा भाऊ आणि सुप्रसिद्ध अभिनेता सनी देओल यानेही प्रतिक्रिया दिली आहे.त्याने या फोटोवर हार्ट इमोजी शेअर करत आपला पाठिंबा किंवा प्रेम व्यक्त केलं आहे.या प्रतिक्रियेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली असून, काही जणांनी कमेंट्समध्ये थेट विचारलं आहे ,”हे नातं आता कन्फर्म समजायचं का?”अद्याप अभय किंवा अमांडा या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.पण सनी देओलची सकारात्मक कमेंट्स पाहून हे नाते कन्फर्म समजायचं का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.