movie (फोटो सौजन्य: social media)
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबियांचे दररोज नवं नवीन कारनामे समोर आले आहे. राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या लोकांच्या अनेक कारनामे अनेक गोष्टी कोठडीत असतांना समोर येत आहे. आता पुतण्या संतोष हागवणेंसाठीही त्यांनी एक चित्रपट दिग्दर्शकाला धमकावल्याची माहिती समोर आली आहे. कालच. हगवणे यांच्याकडून एका जेसीबी व्यवहारात जेसीबी खरेदी करणाऱ्यास ११ लाख रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार पोलिसांना दाखल झाली होती. त्यानंतर आता एका चित्रपट दिग्दर्शकाने हगवणेंनी आपल्याला फसवल्याची माहिती दिली आहे.
चाळिशीनंतर कपूर घराण्याची लेक करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली….
हगवणे कुटुंबियांचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. हगवणे कुटुंबियांना चित्रपट क्षेत्रातही पैसे लावल्याची माहिती आहे. राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणे यांनी ‘खुर्ची’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी ‘खुर्ची’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लाखो रुपये थकवल्याचा आरोप दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी केला आहे. चित्रपटाचे पोस्टरही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे.
चित्रपट दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांना हगवणे यांच्याकडून सातत्याने धमक्या येत होत्या. त्यासंदर्भात अविनाश पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार देखील केली आहे. याशिवाय पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडेही लेखी तक्रार केली होती. मात्र, कुठलाही कारवाई झाली नाही. तर, राजेंद्र हगवणे यांची गाडी Ford Endeavour ही कार ‘खुर्ची’ चित्रपटात वापरण्यात आली आहे.
एवढंच नाही तर, राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणेने चित्रपट दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांना पिस्तूल सुद्धा दाखवली होती. माझे मामा पोलीसमध्ये मोठ्या पदावर आहेत, एटीएसमध्ये आहेत तू माझं काहीच करू शकत नाही, असा दमही दिला होता. त्यामुळे, विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा दबाव टाकून हगवणेंनी आणखी एकास दम दिल्याचे उघडकीस पडलं आहे.
‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट, कुस्तीच्या आखाड्यात काय रंगणार?