Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Case No. 99 Marathi Movie: ‘केस नं. ९९’मध्ये नेमकं दडलंय काय? ट्रेलर-पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Case No. 99 Marathi Movie: मराठी अभिनेते अजय पुरकर आता ‘केस नं. ९९’ या आगामी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असून, एका अनपेक्षित मृत्यूमागील सत्य शोधण्याची कथा यात मांडण्यात आली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 09, 2026 | 04:55 PM
Case No. 99 Marathi Movie (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Case No. 99 Marathi Movie (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘केस नं. ९९’ या मराठी सस्पेन्स-थ्रिलरचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित.
  • अजय पुरकर या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
  • अजय पुरकर आणि सई अजय पुरकर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
Case No. 99 Trailer: मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे अजय पुरकर आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत. आजवर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना प्रभावित करणारे अजय पुरकर यावेळी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळताना दिसतील. त्यांच्या ‘केस नं. ९९’ या आगामी मराठी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटा पोस्टर आणि ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या माध्यमातून अजय पुरकर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नवी सुरुवात करत आहेत. या चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. Case No. 99 Marathi Movie:

एका मृत्यूमागचं सत्य शोधण्याचा प्रवास

‘केस नं. ९९’ची कथा एका अनपेक्षित घटनेपासून सुरू होते. एका मृत्यूमुळे अनेक प्रश्न उभे राहतात. नेमकं काय घडलं, या घटनेमागे कोण आहे आणि समोर दिसणारं सत्य खरंच पूर्ण सत्य आहे का, असे प्रश्न कथेत महत्त्वाचे ठरतात. या प्रश्नांची उत्तरं शोधताना तपासाची दिशा बदलत जाते आणि प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होतं.

Prahaar Movie Song: सोनू निगम-श्रेया घोषालची जादू पुन्हा अनुभवायला मिळणार! ‘प्रहार’मधील रोमँटिक गाणं प्रदर्शित

या चित्रपटात अजय पुरकर यांच्यासोबत चिन्मय मांडलेकर आणि मृण्मयी देशपांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या तिघांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र ते कोणती भूमिका करणार हे अद्याप गुलदस्तात आहे.

ट्रेलरमध्ये दिसली रहस्याची झलक

या चित्रपटचा ट्रेलर नुकताच लॉंन्च झाला. यामध्ये प्रकरणाचा शोध घेण्याचे सुरु आहे. तसेच नव-नवीन गुपिते उलगडणार आहे. तपास जसजसा पुढे सरकतो, तसतसा संशय वाढत जातो. प्रत्येक घटनेमागे काहीतरी वेगळं दडलेलं असू शकतं, अशी जाणीव ट्रेलर करून देतो. त्यामुळे प्रेक्षकांना पुढे काय घडणार, याचा अंदाज बांधण्याची संधी मिळते.

या कथेत केवळ गुन्ह्याचा शोध नाही, तर सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागणारी धडपडही महत्त्वाची आहे. एखाद्या प्रकरणात दिसणाऱ्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवता येत नाही. काही प्रश्नांची उत्तरं शोधताना नव्या शंका निर्माण होतात. हाच या चित्रपटाचा मुख्य आधार असल्याचं ट्रेलरवरून जाणवतं.

अजय पुरकर यांनी सई अजय पुरकर यांच्यासोबत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अभिनयाचा अनुभव घेतल्यानंतर दिग्दर्शनाच्या माध्यमातून कथा मांडण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे ‘केस नं. ९९’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही

चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी पोस्टर आणि ट्रेलर पहिल्यावर या प्रकरणाचा शेवट कसा असेल याबद्दल कुतुहूल आहेत. संशयाच्या भोवऱ्यात नेमकं कोण अडकणार आणि मृत्यूमागचं खरं कारण काय, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. निर्मात्यांनी कथेबद्दल फारशी माहिती उघड न केल्यामुळे रहस्य कायम आहे.

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत

‘केस नं. ९९’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर हा चित्रपट येत्या १६ ऑक्टोबर २०२६ ला अल्ट्रा झकास मराठी या ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामुळे घरबसल्या हा सस्पेन्स-थ्रिलर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल. रहस्य, तपास आणि अनपेक्षित घडामोडी आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट लक्षवेधी ठरू शकतो. आता अजय पुरकर यांचं दिग्दर्शन आणि या कथेत दडलेलं सत्य प्रेक्षकांना किती भावतं, हे प्रदर्शनानंतरच स्पष्ट होईल.

Web Title: Case no 99 marathi movie ajay purkar directorial debut trailer ott release rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
1

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
2

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
3

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप
4

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.