Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नामदेव ढसाळांची अवहेलना करणाऱ्यांवर संतापला हेमंत ढोमे, अभिनेत्याची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

सध्या सर्वच स्तरांमधून दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाबद्दल काही प्रतिक्रिया येत आहेत. प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 02, 2025 | 05:58 PM
नामदेव ढसाळांची अवहेलना करणाऱ्यांवर संतापला हेमंत ढोमे, अभिनेत्याची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

नामदेव ढसाळांची अवहेलना करणाऱ्यांवर संतापला हेमंत ढोमे, अभिनेत्याची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Follow Us
Follow Us:

महेश बनसोडे दिग्दर्शित ‘चल हल्ला बोल’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वरुण राणा दिग्दर्शित ‘चल हल्ला बोल’ चित्रपट पद्मश्री, बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाची गेल्या काही वर्षांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. प्रदर्शनाच्या मार्गावर असलेला चित्रपट नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेतल्याचा दावा चित्रपटाच्या टीमने केला आहे.

बिपाशा बासूला काम का मिळत नाहीये? मिका सिंगने जरा स्पष्टच सांगितलं…

सेन्सॉर बोर्डाने या कविता चित्रपटातून हटवण्यास सांगितलं आहे. कविता आक्षेपार्ह असल्याचं म्हणत चित्रपटातील सर्व कविता काढून तो प्रदर्शित करण्याची अट सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांसमोर ठेवली आहे. इतकंच नाही तर त्यांनी थेट ‘कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही’ असा सवाल नोटीसमध्ये विचारल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सध्या सर्वच स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

“जातीचा सैतान कुठं नेऊन पुरावा?” हा प्रश्न विचारणारा, आणि अनेकांना खटकणारा पॅंथर होते नामदेव ढसाळ! आता या सैतानांना सोईने हे नाव विसरायचं असेल तर ठणकावून सांगा… समता आणि मानवतेचा प्रसार करणारे पॅंथर होते नामदेव ढसाळ! महाराष्ट्राने, देशाने जगभरात सगळ्यांनी गौरवलेला…… pic.twitter.com/ijebXMULe4 — Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) March 1, 2025

अभिनेता हेमंत ढोमेने या घटनेवरून पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्याने एक्सवर (ट्वीटर) एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तो म्हटला आहे की, “ “जातीचा सैतान कुठं नेऊन पुरावा?” हा प्रश्न विचारणारा आणि अनेकांना खटकणारा पँथर होते नामदेव ढसाळ! आता या सैतानांना सोईने हे नाव विसरायचं असेल तर त्यांना ठणकावून सांगा… समता आणि मानवतेचा प्रसार करणारे पॅंथर होते नामदेव ढसाळ! महाराष्ट्राने, देशाने जगभरात सगळ्यांनी गौरवलेला… बहुजनांचा नायक, अफाट वैश्विक महाकवी होता ‘नामदेव ढसाळ’. आपण ठणकावून सांगितलं तर आणि तरंच हे चित्र बदलेल! नुसता एक माणूस हाकलून चालणार नाही, आख्खी व्यवस्थाच बदलावी लागणार आहे. या नायकाने पेटवलेली माणसं पुन्हा पेटवावी लागणार!”

‘तारक मेहता’मधला ‘मिस्टर अय्यर’ ४४ व्या वर्षीही आहे अविवाहित, अभिनेत्याने खरं कारण सांगत केला खुलासा

१ जुलै २०२४ रोजी हा चित्रपट मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरलं होतं. पण, सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याने तो रखडला आहे. ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपटाची कथा दलित पँथर, युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित आहे. या चित्रपटात पद्मश्री कवी नामदेव ढसाळ यांची कविता आहे. पण, कवितेत शिव्या आहेत, अश्लीलता आहे, असे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडलंय.

Web Title: Hemant dhome reaction on namdev dhasal chal halla bol movie censor board controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 05:58 PM

Topics:  

  • Film Director
  • marathi actor
  • marathi film

संबंधित बातम्या

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’
1

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा
2

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव
3

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
4

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.