(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
ब्रिटिश पॉप स्टार, गायिका आणि गीतकार मारियान फेथफुल यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवारी लंडनमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची संगीत जाहिरात कंपनी रिपब्लिक मीडियाने याची पुष्टी केली आहे. त्यांची संगीत कारकीर्द आणि जीवन दोन्ही चढ-उतारांनी भरलेले होते, परंतु त्यांनी त्यांच्या गाण्यांनी आणि संगीताद्वारे लोकांच्या मनावर राज्य केले आहे. मारियान फेथफुलचे नाव नेहमीच द रोलिंग स्टोन्सशी जोडले गेले. त्यांनी बँडच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांना प्रेरणा दिली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी ‘सिंडिकेट’बद्दल पसरलेल्या अफवांचे केले खंडन, पोस्ट शेअर करत म्हणाले…
प्रवक्त्यांनी एक निवेदन जारी केले
कंपनीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “गायक, गीतकार आणि अभिनेत्री मारियान फेथफुल यांच्या निधनाची घोषणा करताना आम्हाला खूप दुःख होत आहे. मारियान यांचे आज लंडनमध्ये तिच्या प्रेमळ कुटुंबाच्या सान्निध्यात शांततेत निधन झाले. त्यांची आठवण कायमची येईल.” असे लिहून त्यांनी शोककळा व्यक्त केली आहे.
Hera Pheri 3: प्रियदर्शन ‘हेरा फेरी ३’ करण्यासाठी सज्ज; राजू, श्याम आणि बाबुराव पुन्हा दिसणार एकत्र!
ब्रोकन इंग्लिशमुळे खूप लोकप्रियता मिळाली
मिक जॅगरसोबतच्या त्यांच्या नात्यामुळेही त्या नेहमीच चर्चेत आल्या. त्यांचे आयुष्य व्यसन, वैयक्तिक संघर्ष आणि क्लेशकारक अनुभवांनी भरलेले होते, परंतु हे सर्व असूनही, त्यांनी कधीही त्यांची कला आणि संगीत सोडले नाही. मारियान फेथफुलचा १९७९ चा अल्बम ब्रोकन इंग्लिश अजूनही तिच्या सर्वात महत्त्वाच्या कामांपैकी एक मानला जातो. त्यांची गाणी, त्यांचा आवाज नेहमीच चाहत्यांच्या स्मरणात राहणार आहे. या बातमीने चाहत्यांना देखील खूप दुःख झाले आहे.