(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक सचिन पिळगावकर हे नेहमीच त्यांच्या स्पष्ट, थेट आणि वेगळ्या विचारांमुळे चर्चेत असतात. त्यामुळे सचिन यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. नुकत्याच एका सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांच्या दिलखुलास आणि हटके विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. एका कार्यक्रमात सचिन पिळगावकर त्यांच्यासोबत शेखर सुमन आणि इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. त्यावेळी माझी मातृभाषा मराठी असली तरी मी उर्दू भाषेत विचार करतो, अशा शब्दात सचिन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते काय म्हणाले पाहुया.
वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा दिमाखात समारोप सोहळा संपन्न !
नुकतेच सचिन पिळगावकर‘बहार ए उर्दू’ या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी उर्दू भाषेबाबतचं त्यांच्या मनातलं प्रेम व्यक्त केलं.सचिन पिळगावकर म्हणाले की, ”माझी मातृभाषा मराठी आहे पण मी विचार उर्दू भाषेतून करतो. मला माझ्या बायकोने किंवा कोणीही रात्री ३ वाजता जरी उठवलं तरी मी उर्दू बोलून जागा होतो. मी केवळ उर्दूतून जागा होत नाही तर मी उर्दूसोबत झोपतोही. माझं उर्दू भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडतं.” अशाप्रकारे सचिन यांनी वक्तव्य केलं. अभिनेते शेखर सुमन यांनीही सचिन यांच्या म्हणण्याला दाद दिली.
अभिनेत्री मृण्मयीच्या वाढल्या अडचणी, ‘मना’चे श्लोक’ चित्रपटावर बॅनची टांगती तलवार; नेमकं काय प्रकरण?
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आजही तितक्याच जोमात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. बालकलाकार ते दिग्दर्शक, गायक आणि आजच्या ओटीटी युगातला दमदार अभिनेता सचिन यांचा प्रवास प्रेरणादायी ठरतो. अलीकडच्या काळात सचिन पिळगावकर यांनी हिंदी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली अभिनयकौशल्यं सिद्ध केली आहेत. त्यांनी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या राजकीय पार्श्वभूमीवर आधारित वेब सिरीजमध्ये प्रभावी भूमिका साकारून समीक्षकांचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. याशिवाय त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा २’ या मराठी चित्रपटामधून पुन्हा एकदा आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांचं मन जिंकलं.शोले’, ‘बालिका वधू’, ‘नदिया के पार’, ‘अवतार’, ‘सत्ते पे सत्ता’ यांसारख्या सुपरहिट हिंदी सिनेमांमध्ये दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलंय. त्यामुळेच उर्दू, हिंदी भाषेवर त्यांची चांगली पकड आहे.