(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“त्याची पँट काढा…”, महेश भट्टला दाढीवाल्या लोकांनी घेरलं, केलेलं घृणास्पद कृत्य
मागील काही वर्षांमध्ये चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींवरून अनेक चर्चा होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या सिनेमांमध्ये दाखवण्यात येणारे सीन्स, कलाकारांचे कपडे, सिनेमांमध्ये देण्यात येणारे संदर्भ न स्पष्ट झाल्यामुळे थेट चित्रपट बॉयकॉट करण्याची धमकीही दिली जाते. अशाच वादात आता मृण्मयी देशपांडेचा ‘मनाचे श्लोक’ हा सिनेमा अडकलेला पाहायला मिळतो आहे. या सिनेमाच्या नावावर आक्षेप नोंदवण्यात आला असून थेट चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी आता केली जात आहे.
चित्रपटाला का मिळतोय विरोध?
सज्जन गड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाच्या शीर्षकाचा विरोध केला आहे. ‘मनाचे श्लोक’ या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर सिनेमासाठी केल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर, मनोरंजनासाठी, काल्पनिक गोष्टींसाठी नको, अशी मागणी त्यांनी केली आहे. चित्रपटाचं नाव बदललं नाही तर आंदोलनाचा इशाराही श्री समर्थ सेवा मंडळाने दिला आहे. परंतु, अद्याप या प्रकरणी सिनेमाची टीम किंवा मृण्मयी देशपांडे हिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये.
अक्षय कुमारचा अनोखा प्रश्न आणि फडणवीसांचं हटके उत्तर; संत्र्यावरून रंगली चर्चा!
दरम्यान, ‘मनाचे श्लोक’ हा सिनेमा कौटुंबिक असून तो नातेसंबंधांवर आधारित आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, करण परब यांसारखे तरुण कलाकार देखील दिसणार आहेत, तर लीना भागवत, मंगेश कदम आणि शुभांगी गोखले असे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून, हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.






