Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“फराळातला एक पदार्थ तरी आईसोबत बनवायचाच!”, विजया बाबरची दिवाळीची गोड परंपरा

झी मराठीवरील 'कमळी' मालिकेतील कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर दिवाळीचा आनंद आपल्या खास पद्धतीने लुटते याबद्दल बोलताना ती म्हणाली,...

  • By अमृता यादव
Updated On: Oct 17, 2025 | 01:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळी हा एक असा सण आहे जो कुटुंब, प्रेम आणि एकत्र येण्याचा उत्सव असतो. दिवाळीचा गोडवा तेव्हाच वाढतो, जेव्हा तो आपल्या प्रियजनांसोबत साजरा करता येतो. झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेतील कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर दिवाळीचा आनंद आपल्या खास पद्धतीने लुटते. शूटिंग मध्ये व्यस्त असूनही ती या सणासाठी वेळ काढते आणि यावर्षी तिला अधिक सुट्ट्या मिळणार असल्याने तिचा उत्साह अधिकच वाढलाय.

विजया दिवाळीच्या काही गोष्टी शेयर करताना म्हणते, “माझं व्यक्तिमत्त्व चिवड्यासारखं आहे ज्यात शेंगदाणे, खोबरं, तिखट, साखरेचा गोडपणा, सगळं काही असतं. अगदी तसेच माझ्यात अनेक गुण आहेत. माझ्या कुटुंबाचं म्हणणं मी एक छोट्या बॉंम्ब सारखी आहे आणि मी ‘छोटा पॅकेट, मोठा धमाका’ आहे!” या गोड आणि रंगीत सणात ती तिच्या कुटुंबासोबत एकत्र येते. विजयाची दिवाळीतील खास आठवण म्हणजे “लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपूर्ण सोसायटीतील मंडळी एकत्र येऊन फटाके लावणे आणि नंतर सर्व तरुण मंडळी मिळून जेवायला जाणे. ही परंपरा अजूनही न चुकता पाळली जाते. लहानपणी मी खूप खट्याळ होते. दिवाळीत मी फटाके फोडायचे, पण आता मात्र फक्त शगुनाची फुलबाजी लावते आणि सण साजरा करते. दिवाळीपूर्व तयारीत सहभागी होणं हे माझ्यासाठी फार आनंददायक असतं. फराळ करताना सगळं कुटुंब एकत्र येणं हा एक वेगळाच आनंद असतो. आता शुटिंगमुळे वेळ मिळत नाही, पण मी आईला सांगून ठेवले आहे की कमीत कमी एक पदार्थ तरी ठेव, जो मी सर्वांसोबत बसून बनवू शकेन.”

अर्जुन बिजलानी ठरला Rise and Fall चा विजेता, टीव्ही अभिनेत्याने अरुष भोलाला दिली जबरदस्त टक्कर

विजयाचं म्हणणं आहे की, “दिवाळी म्हणजे एकत्र येणं, आठवणींचा गोडवा आणि प्रेमाचं वातावरण. काम कितीही असलं तरी कुटुंबासाठी वेळ काढायलाच हवा.” ती चाहत्यांना असा संदेश देते की, “दिवाळी साजरी करताना पर्यावरणाची काळजी घ्या, प्रेम वाटा आणि जुन्या आठवणींना नव्या रंगात सजवा.”

झी मराठी वाहिनीवर ३० जून २०२५ पासून सुरू झालेली ‘कमळी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसत आहे. विजया बाबर हिने साकारलेली ‘कमळी’ ही भूमिका ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या, पण मोठं स्वप्न पाहणाऱ्या मुलीची कहाणी सांगते. शिक्षण, आत्मभान, आणि समाजाशी झगडत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याचा कमळीचा प्रवास या मालिकेतून उलगडतो.

‘डिटेक्टिव धनंजय’ वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस, आदिनाथ कोठारेचा हटके लूक चर्चेत

या मालिकेचा प्रोमो न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला असून, ती पहिली मराठी मालिका ठरली जी तिथे प्रमोट झाली. हे मराठी मालिकांच्या इतिहासातील एक अनोखं पाऊल ठरलं आहे.

Web Title: I have to make at least one snack with my mother vijaya babars sweet diwali tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

38 व्या वर्षी ‘बबिता जी’ करणार विदेशी व्यक्तीसोबत लग्न? कोरियन अभिनेत्यावर क्रश; नवऱ्याच्या अटींचा खुलासा
1

38 व्या वर्षी ‘बबिता जी’ करणार विदेशी व्यक्तीसोबत लग्न? कोरियन अभिनेत्यावर क्रश; नवऱ्याच्या अटींचा खुलासा

Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही या आठवड्याचे खरे..”, प्रभू शेळकेच्या कामगिरीवर रितेश भाऊची शाबासकी, म्हणाला…
2

Bigg Boss Marathi 6: ”तुम्ही या आठवड्याचे खरे..”, प्रभू शेळकेच्या कामगिरीवर रितेश भाऊची शाबासकी, म्हणाला…

Bindiya Ke Bahubali Season 2: सत्ता, विश्वासघात आणि कौटुंबिक ड्रामा, ‘बिंदीया के बाहुबली सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित
3

Bindiya Ke Bahubali Season 2: सत्ता, विश्वासघात आणि कौटुंबिक ड्रामा, ‘बिंदीया के बाहुबली सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित

Bigg Boss Marathi 6: “हे माझं घर आहे आणि इथे फक्त…”, स्पर्धकांच्या धक्काबुक्कीवर भाऊ संतापले
4

Bigg Boss Marathi 6: “हे माझं घर आहे आणि इथे फक्त…”, स्पर्धकांच्या धक्काबुक्कीवर भाऊ संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.