फोटो सौजन्य - social media
ओटीटी बिग बॉसवर येत्या दिवसात अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी पत्रकार दीपक चौरासिया यांनी केलेल्या त्यांच्या खुलास्यामुळे ते चांगलेच चर्चेत होते. दररोज काही ना काही नवीन बिग बॉसवर पाहायला मिळत आहे. त्यात सध्या बिग बॉस पर्व ३ चे कॉन्टेस्टन्ट अरमान मलिक आणि विशाल पांडे चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. रागात अरमान मलिकने विशाल पांडेच्या कानाखाली मारली असून त्यादोघांमध्ये मोठा वाद झाल्याचे दिसून आले. त्यांच्या या वादावरून अनेकांचे अनके मत आहेत. त्या मतांमध्येही दोन गट तयार झाल्याचे दिसून येत आहे. काही जणांच्या मते अरमान मलिक बरोबर आहे. तर काही जणांचे असे म्हणणे आहे कि विशाल पांडे त्याच्या जागी बरोबर आहे.
टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी या घटनेवर त्यांचे मत दिले आहेत. सुरुवातीला एल्वीश यादवने त्याचे मत व्यक्त करत त्याने विशाल काही चुकीचा वागला नसल्याचे सांगितलं आहे. यावर मत देताना तो म्हणाला कि, “हे असेच चालू राहिले तर लोकं हाथ उचलत राहतील आणि शोमध्ये टिकून राहतील. गेल्या सीजन मध्ये अभिषेक तर या सीजनमध्ये अरमान!” अशा शब्दात त्याने अरमानसह गेल्या पर्वातील अभिषेकलाही डिवचलं आहे. विशालने अरमान मलिकच्या पत्नीला छेडले नसून त्याला फक्त वहिनी (अरमानची पत्नी) आवडतात इतकेच सांगितले होते, असं एल्वीशच म्हणणं आहे.
या वादात आता अभिनेत्री गौहर खानने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे. गौहरने कुणाचंही नाव न घेता या मुद्यावर स्पष्टपणे तिचे मत इंस्टाग्रामच्या स्टोरीवरून जाहीर केले आहे. ती म्हणते कि, “आता विवाहित लोकांना सुंदर म्हणणे गुन्हा आहे का?” एकंदरीत तिचा हा प्रश्न बिग बॉसमध्ये घडलेल्या प्रसंगाला धरून आहे हे दिसून येतं.
लव कटारियाशी बोलत असताना कृतिका कडे पाहून विशाल पांडे म्हणतो कि वहिनी मला खूप सुंदर वाटतात. यानंतर विशालने अरमानला भाग्यशाली असण्याचेही म्हटले आहे. जेव्हा पायल मलिक बिग बॉस पर्व ३ मध्ये परतली तेव्हा तिने हे मुद्दे धरून ठेवले. जेव्हा कॅमेरामागील बोलणे समोर आले तेव्हा अरमानचा पारा निसटला आणि त्याने विशालच्या कानशिलात लगावली.