(फोटो सौजन्य: Instagram)
आताच्या दुनियेत कुणी कुणाचा फारसा विचार करत नाही. अशात कोणी आपल्याला मदतीचा हात दिलाच तर त्याहून मोठं भाग्य नाही. जसं प्रेम, ईर्षा, राग आपल्यात भरलेला असतो तसाच वेळ आली तर आपल्यात मदतीचा स्वभावही रुजू व्हायला हवा. आपण केलेली मदत ही कधीच वाया जात नाही आणि हाच विचार लहानपणापासून मुलांमध्ये रुजू करायला हवा. मदतीची गरज ही फक्त मानवालाच नाही तर प्राण्यांनाही लागू शकते. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक लहान मुलगा एका श्वानाची मदत करताना दिसला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपला जीव धोक्यात घालून त्याने ही मदत करू पाहिली जे पाहून सर्वांनाच ऊर भरून आला. घटनेत पुढे एक ट्विस्टही आला ज्याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
गर्दीचा फायदा घेत महिलेने दुकानातून केली चोरी, पकडले जाताच लोकांनी केली बेदम मारहाण; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये, एक मुलगा विहिरीत उडी मारून श्वानाची मदत करताना दिसून येतो. एका दोरीला त्याने स्वतःला बांधलेले असते आणि याच्या साहाय्यानेच तो विहरीत खाली जातो. यावेळी त्याच्या कमरेलाही एक दोरी बांधलेली असते ज्यात श्वानाला बांधून तो वर चढू लागतो. विहिरीच्या वर आणखीन एक मुलगा त्याची यात मदत करत असतो तो वरून मुलाची दोरी पकडून त्याला खेचू लागतो. मुलगा काठावर येतो खरा पण विहिरीतून बाहेर पडणार तितक्यताच कमरेच्या दोरीला बांधलेला कुत्रा दोरीतून बाहेर सटकतो आणि थेट खोल विहिरीत जाऊन आदळतो. चिमुकल्याच्या हिमतीने कौतुक करावे तितके कमी आहे पण शेवटी तो जी मदत करू पाहत होता ती मदत काही पूर्ण होत नाही. डॉग रेस्क्यू होता होता राहते आणि इथेच सर्वांना हिरमोड होतो. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओला 3 लाखांहून अधिकच्या व्युज मिळाल्या आहेत.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @naturegeographycom नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “व्वा! त्या मुलाने स्वर्गाचे तिकीट आधीच जिंकले आहे!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दयाळूपणाचे किती अद्भुत प्रदर्शन. त्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले नाही याचे दुःख आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरंच दोघांसाठी खूप वाईट वाटतंय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.