Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जवळपास १५ तास वीणा घेऊन उभी होते”, इंद्रायणीने शेअर केला शुटिंग दरम्यानचा अविस्मरणीय अनुभव

इंद्रायणीचा आता एकच ध्यास आहे, तो म्हणजे विठूच्या वाडीत शाळा उघडणे ते पण एका वर्षात. मोहित रावने दिलेले आव्हान इंद्रायणीने स्वीकारले असून आता ते पूर्ण करण्यासाठी फंट्या गँगच्या मदतीने इंदू वर्गणी गोळा करताना दिसणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 10, 2025 | 04:48 PM
"जवळपास १५ तास वीणा घेऊन उभी होते", इंद्रायणीने शेअर केला शुटिंग दरम्यानचा अविस्मरणीय अनुभव

"जवळपास १५ तास वीणा घेऊन उभी होते", इंद्रायणीने शेअर केला शुटिंग दरम्यानचा अविस्मरणीय अनुभव

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत आता इंद्रायणीचा आता एकच ध्यास आहे आणि तो म्हणजे विठूच्या वाडीत शाळा उघडणे ते पण एका वर्षात. मोहित रावने दिलेले आव्हान इंद्रायणीने स्वीकारले असून आता ते पूर्ण करण्यासाठी फंट्या गँगच्या मदतीने इंदू वर्गणी गोळा करताना दिसणार आहे. पण, यातच मोहितराव इंद्रायणीच्या हातात एक रुपयाचे नाणे ठेवत तिला हिणवलं आणि म्हणाला – “असेच पैसे गोळा केलेस तर होईल शाळा सुरु १०० वर्षांत.” हे मोहितरावाचं म्हणणं इंद्रायणीच्या मनाला खूप लागतं.

‘ऑपरेशन सिंदूर’ रुपेरी पडद्यावर दिसणार, चित्रपटाची घोषणा होताच नेटकरी भडकले; म्हणाले- “लाज वाटत नाही?”

आणि इंदू ठरवते शाळा सुरू करण्यासाठी सगळी पंचक्रोशी आता होणार हजर कारण इंदू करणार २४ तास हरी नामाचा गजर! विठूच्या वाडीतील लोकांमध्ये शाळेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी इंदूचा हा अनोखा प्रयोग सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे हे नक्की. आता बघूया पुढे मालिकेत काय घडणार? कसे सगळे एकत्र येऊन इंद्रायणीच्या पुढाकाराने शाळेसाठी हे पैसे गोळा करणार? आता इंद्रायणीच्या या प्रयत्नांमध्ये आनंदीबाई, करिष्मा, मोहीतराव कसे अडथळे आणणार? आणि इंदू ते कसे परतवून लावणार?

फवाद खान आणि माहिरा खानला ‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात बोलणं भोवलं, सर्वच पाकिस्तान कलाकारांना केली आजीवन बंदी

इंद्रायणी मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या कांची शिंदेने शुटिंगचा अनुभव शेअर करताना सांगितले की, “या विशेष भागासाठी आम्हां सगळ्यांचाच कस लागला. तीन दिवस शूट सुरु होतं. सगळ्या टीमने थंडी, पाऊस, वारा सगळ्यावर मात करत शूट केले आहे. पहिल्याच दिवशी तुफान पाऊस आला त्यामुळे खूप टेन्शन आलं. सेटवर १७० जणांचा मॉब होता. त्यामुळे खूप प्रेशर होतं. एक क्षण आहे जिथे इंदूला विठुराया दिसतो तो करताना अंगावर काटा आला खरंच सांगते. एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी होती सेटवर, त्याचा आशीर्वाद आहे असं म्हंटल तर काही चूक नाही ठरणार. अक्षरश: सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. आणि माझं म्हणाल तर प्रत्यके शॉटला मला उभं राहावं लागतं होतं खुपचं कठीण होतं सलग २४ तासाचा हरी नामाचा गजर करणं… हे अजिबातच सोपं नव्हतं. आणि जे कीर्तन आहे ते देखील खूप इंटेन्स होतं. माझ्या हातात वीणा आहे ती देखील वजनाने खूप भारी होती, ती जवळजवळ १५ तास हातात घेऊन उभे होते. जी गोष्ट या भागाद्वारे मांडण्याचा इंदूचा प्रयत्न आहे ती खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे शिक्षण आणि शाळेचे महत्व. जसं मालिकेत इंद्रायणीला महत्वाचे वाटते तसे आम्हांला टीम म्हणून देखील महत्वाचे वाटते ते लोकांपर्यंत पोहचावे. प्रेक्षकांना नक्कीच हा भाग आवडेल याची मला खात्री आहे.”

Web Title: Indrayani serial kanchi shinde play lead role she shared experiance in veena play

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial news
  • marathi serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

नवरात्र विशेष: ‘तुला जपणार आहे’ फेम मीरा उर्फ महिमाला जाणवतो महागौरीशी आत्मिक संबंध
1

नवरात्र विशेष: ‘तुला जपणार आहे’ फेम मीरा उर्फ महिमाला जाणवतो महागौरीशी आत्मिक संबंध

‘आव्हान वाटणाऱ्या सर्व भूमिका करायला आवडतील’ – रसिका वाखारकर
2

‘आव्हान वाटणाऱ्या सर्व भूमिका करायला आवडतील’ – रसिका वाखारकर

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग
3

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग

साडेतीन जागृत शक्तिपीठांच्या प्रचितींची आई तुळजाभवानी मालिकेत अनुभूती!
4

साडेतीन जागृत शक्तिपीठांच्या प्रचितींची आई तुळजाभवानी मालिकेत अनुभूती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.