‘इंद्रायणी’ करणार गुरु माहात्म्य सांगणारे खास कीर्तन, मालिकेत मिळणार भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत येणाऱ्या भागांमध्ये प्रेक्षक अनुभवणार आहेत एक वेगळाच भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास, जिथे श्रद्धा, परंपरा, आणि कर्तव्य यांचं वेगळंच परिमाण उलगडत जाणार आहे. शकुंतलाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर इंद्रायणी भावपूर्ण कृतज्ञतेने विठुरायाचे आभार मानते. व्यंकू महाराजांचा विठ्ठलावरचा विश्वास पुन्हा जागा होतो, पण जेव्हा व्यंकू आणि गोपाळ डॉक्टर विठ्ठलचा आभार मानण्यासाठी रुग्णालयात जातात, तेव्हा डॉक्टरच गायब असतो. तेवढ्यात डॉक्टर वैंगणकर एक धक्कादायक सत्य उघड करतात, त्यांनी असा कोणताही डॉक्टर पाठवलेलाच नव्हता! मग, डॉक्टर विठ्ठल कोण होता? हा प्रश्न सगळ्यांना विचारात टाकतो. आता मालिकेत गुरुपौर्णिमेनिमित्त इंद्रायणीचे खास कीर्तन पहायला मिळणार आहे ज्याद्वारे ती गुरु महात्म्य देखील सांगणार आहे. मालिकेत काय घडणार जाणून घेण्यासाठी पहा ‘इंद्रायणी’, दररोज संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.
हृदयाला भिडेल असा ‘Dhadak 2’ चा ट्रेलर, तृप्ती आणि सिद्धांतच्या जोडीने जिंकले मन
दरम्यान, आषाढी वारीतून यशस्वी दर्शन घेऊन आलेला अधोक्षज, शकुंतलासाठी पंढरपूरहून पवित्र अबीर आणि प्रसाद घेऊन येतो, पण गोपाळ केवळ औषधांवर विश्वास ठेवत असल्यामुळे अधोक्षजला अडवतो. इंद्रायणी गोपाळला स्पष्ट शब्दांत इशारा देते अधोक्षजचा अपमान सहन केला जाणार नाही. गुरूपौर्णिमेच्या दिवशी इंद्रायणी पहाटे विठुरायाची पूजा करून आपल्या गुरू व्यंकू महाराजांचे आशीर्वाद घेते. संध्याकाळी ती आपल्या गुरूप्रणीत कीर्तन परंपरेत नवा अध्याय सुरू करते, गुरु व्यंकू महाराजांचे मनोभावे पाद्यपूजन करते. जेव्हा व्यंकू महाराज तिला ‘कीर्तनकार’ परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रेरित करतात. हा क्षण इंद्रायणीसाठी अत्यंत गौरवाचा असतो, पण आनंदाला लगेच ग्रहण लागतं अनंदीला हे सगळं खटकतं.
गायिका आशा भोसलेंच्या निधनावर मुलगा आनंद यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे वृत्त खोटं…”
गुरुपौर्णिमेच्या पार्शवभूमीवर इंद्रायणी शाळेचे आणि गुरुचे महत्व सांगणारे एक विशेष कीर्तन सादर करणार आहे. पण तिच्या कीर्तनाच्या दरम्यान मोहीतराव आणि आनंदी विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. यात गावकरी तिला साथ देणार ? इंद्रायणीला अधोक्षजची मदत मिळेल ? या सगळ्या घडामोडींमध्ये इंद्रायणी तिच्या श्रद्धेवर, निष्ठेवर आणि कर्तव्यावर कशी ठाम राहते आणि संकटांना तोंड देते हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक ठरणार आहे.
कॅनडातील कॅप्स कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्मासाठी आणखी एक वाईट बातमी, काय घडलं?
शाळेबद्दलचा मुद्दा आणि दिग्रसकर घराण्याच्या कीर्तनकार परंपरेचा वारसदार ह्यावरून आनंदी वेगळंच राजकारण सुरू करणार, इंद्रायणीला दुखवण्याचा तिचा हेतू साध्य होऊ शकेल का? सगळ्या संकटांना समोर जाऊन शाळा सुरू करणे आणि व्यंकू महाराजांनी सोपवलेली जबाबदारी ती कशी पार पाडणार हे गुरुपौर्णिमेच्या आठवड्यात पाहायला विसरू नका. इंद्रायणीचा विश्वास, तिची सामाजिक बांधिलकी, आणि तिच्या कर्तृत्वावर उठलेले आरोप या सगळ्यांना ती कसा तोंड देते हे पाहण्यासाठी जरूर पहा ‘इंद्रायणी’, दररोज संध्या ७ वा. आपल्या कलर्स मराठीवर.