सध्या स्टार प्रवाह मालिकांच्या TRP च्या शर्यतीत घरोघरी मातीच्या चुली ही मालिका देखील अव्वल स्थानावर आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत काही दिवसांपूर्वीच जानकी आणि ऋषिकेषची लग्नाआधीची लव्हस्टोरी सांगण्यात आली होती. यामध्ये जानकीचा लग्नाआधीचा मित्र मकरंदचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं. मकरंदच्या प्रेमाच्या हट्टामुळे नाईलाज झालेली जानकी लग्नाला तयार होते पण घडतं काही असं एका कड्यावर मकरंद पिस्तुल हातात घेऊन ऋषिकेशला मारण्याच्या बेतात असताना जानकीशी मकरंदची झटापट होते आणि मकरंद कड्यावरुन तोल जात खाली पडतो.त्यामुळे गेले कित्येक दिवस मकरंदचे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. आपल्या भावाच्या या अवस्थेला जानकी जबाबदार आहे आणि तिला सुखाने जगू द्यायंच नाही या सूडाने पेटलेली माया म्हणजे मकरंद बहिण गेले कित्येक दिवस माक्समॅन म्हणून रणदिवे कुटुंबाला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्याला मायाच्या कटकारस्थानात दिला कोण मदत करत असेल तर ती म्हणजे ऐश्वर्या.