Anand Bhosle Reacts On Her Mother Asha Bhosle Death Rumours Says It Is Untrue
गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्या सारख्या पसरताना दिसत आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर आणखी एका सुप्रसिद्ध सेलिब्रिटीच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या निधनाचे खोटे वृत्त पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. आता या बातमीवर आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कॉमेडी, ॲक्शन आणि ड्रामाचा तडका… ‘Son Of Sardaar 2’चा अफलातून ट्रेलर रिलीज
सोशल मीडियावर शबाना शेख नावाच्या फेसबूक युजरने आशा भोसले यांच्या निधनाचीही ही बातमी सर्वात आधी शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये, आशा भोसले यांच्या फोटोला हार घातलेला दिसत असून एक छोटी पोस्ट सुद्धा शेअर केलेली आहे. पोस्टमध्ये लिहिण्यात आलंय की, “सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. ०१ जुलै २०२५ रोजी एका संगीतमय युगाचा अंत झालेला आहे.”यानंतर, अनेकांनी शबानाच्या पोस्टवर कमेंट करत दुःख व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.
कॅनडातील कॅप्स कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्मासाठी आणखी एक वाईट बातमी, काय घडलं?
सोशल मीडियावर आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या मुलाने ई- टाईम्सला मुलाखत दिली आहे. आईच्या निधनाचे वृत्त खोटं असून आईची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडेच, रेखा यांच्या ‘उमराव जान’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आशा भोसले यांनी उपस्थिती लावली होती. हा सदाबहार क्लासिकल चित्रपट ४४ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झाला होता. यासोबतच आशा भोसले त्यांचे दिवंगत पती आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांची ८५ वी जयंती साजरी करताना दिसल्या होत्या.