'# लय आवडतेस तू मला' मालिकेला रंजक वळण, सानिकाला मिळणार अप्पांचा पाठिंबा
कलर्स मराठीवरील # लय आवडतेस तू मला मालिकेत सरकार – सानिका एकामागोमाग एक अशा येणाऱ्या अनेक संकटांना खंबीरपणे सामोरे जाताना दिसत आहेत. मागच्या आठवड्यात सानिकाने गावातल्या बायकांना सक्षम करण्याचे महत्वाचे पाऊल उचले. पण आता कळशी गावातल्या संघर्षाला नवं वळण मिळालं आहे. सई सानिकाचा पराभव करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे.
आधीच तिने सानिकाच्या व्यवसायात अनेक अडथळे निर्माण केले आणि आता ती थेट गावातल्या पुरुषांना सानिकाच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. सई गावातील पुरुषांना सानिकाच्या विरोधात उभं करण्याचा कट आखणार आहे. त्यांना असं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की, सानिकाच्या व्यवसायमुळे बायका व्यस्त राहतात आणि असं करून ती गावातील लोकांचे संसार मोडण्याचा प्रयत्न करते आहे.
सई असं सांगून गावातील पुरुषांच्या मनात भीती निर्माण करताना दिसणार आहे आणि त्यामुळेच गावातील काही पुरुष सानिकावर चिडणार आहेत. सई करत असलेल्या कुरघोड्या आणि आखत असलेले कट तिच्यावरच सानिका उलटवून लावणार आहे. यात तिला अप्पांची खंबीर साथ कशी मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. पुढे मालिकेत काय होणार हे जाणून घेण्यासाठी पहा # लय आवडतेस तू मला सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
Historical Shows On OTT: ऐतिहासिक वेबसीरीज आवडतात का ? तर OTT वर पाहा ‘हे’ शो
या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा सानिकाने हार मानली नाही. ती बायकांच्या बाजूने ठामपणे उभी राहून पुरुषांना एक आव्हान देताना दिसणार आहे. घर सांभाळायचं धाडस आहे का? तर करून दाखवा. गावातील पुरुष मंडळी ही आवाहन स्वीकारतील का? हे बघुया. या सगळ्या प्रकारामुळे सानिकावर मात्र अजून एक संकट येणार आहे आणि ते म्हणजे तिला व्यवसाय बंद करावा लागणार का ? सानिका तिचा व्यवसाय बंद करेल का ?
‘कोकणची चेडवा with कोकणचा जावई’, सौंदर्याची खाण दिसतेय ‘कोकण हार्टेड गर्ल’
हे सगळे सुरू असताना अप्पा बरे होऊन परततात आणि सानिकाला ठाम पाठिंबा देतात. अप्पांचा पाठिंबा मिळताच सानिकाला नवी ऊर्जा मिळते. अप्पांच्या समर्थनानंतर सईचा पुढचा डाव काय असेल सानिकाला अप्पांचा आधार मिळाल्याने सईच्या डावपेचांना मोठा धक्का बसला आहे. पण सई इतक्यात शांत बसेल का? ती सानिकाविरोधात आणखी काही कट रचणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.