बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई- बाबा होणार आहेत. या जोडप्याच्या घरी २०२५ मध्ये म्हणजेच या वर्षी चिमुकल्याचं आगमन होणार आहे. अथियाने काही तासांपूर्वीच 'प्रेग्नंन्सी शूट' केलंय. अथिया शेट्टीने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. अथिया शेट्टीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये, अथिया शेट्टी आणि केएल राहुलने प्रेग्नेंसीची घोषणा केली होते. प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा या कपलने 'प्रेग्नंन्सी शूट' केलंय.
Mom-To-Be Athiya Shetty Glows In Stunning Maternity Shoot, KL Rahul Cradles Her Baby Bump In Heartwarming Pics
आथियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोजेस देताना दिसत आहे. फोटोमधील तिच्या इंटेन्स लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आथियाने पिंक कलरचा लाँग वनपिस आणि राहुलने डेनिम शर्ट- जीन्स वेअर करत दोघांनीही रोमँटिक पोजेस देत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्यांच्या रोमँटिक फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
फोटोमध्ये, अथियाने ओपन शर्ट ठेवत बेबी बंप दाखवत तिने डेनिम जीन्स वेअर करत कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक जबरदस्त फोटो पोजेस दिल्या आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अथिया खूपच सुंदर दिसत आहे.
फोटो शेअर करताना अथियाने 'ओह बेबी' असं कॅप्शन दिलं आहे. फोटोमध्ये दोघेही एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. त्यांच्या रोमँटिक पोजेसची चांगलीच चर्चा होत आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये या जोडप्यानं आपण आई बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर दोघांच्याही चाहत्यांचा आणि कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार नव्हता.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसमध्ये एका समारंभात लग्न केलं. मोजक्या मित्रांसह कुंटुंबीयांनी या समारंभाला हजेरी लावली होती.