सोशल मीडियावर राज्यभरात तळ कोकणाच्या मालवणी बोलीतून राज्यभरात मोठा चाहतावर्ग तयार करणारी अंकिता वालावलकर म्हणजे कोकण हार्टेड गर्ल नुकतेच विवाह बंधनात अडकली आहे. संगीत कम्पोजर कुणाल भगतशी तिची लग्नगाठ जोडली गेली आहे. अशामध्ये हे नवं जोडपं राज्यभरात फार चर्चेत होतं. अंकिताने नवीन फोटोज शेअर केले आहेत.
kokanheartedgirlने शेअर केले नवीन Photos. (फोटो सौजन्य- Social Media)
अंकिता वालावलकरने तिच्या प्रसिद्ध अशा @kokanheartedgirl या इंस्टाग्राम हॅन्डलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एका फोटोत नवं जोडपं दिसत आहे.
तर इतर फोटोंमध्ये अंकिताचे सोलो फोटोज आहेत. या छायाचित्रांमध्ये अंकिता फार आकर्षक आणि सुंदर दिसत आहे.
Beige रंगातील या साडीमध्ये अंकिता फार सुंदर दिसत आहे. कॅप्शनमध्ये अंकिताने तिच्या या संपूर्ण Look विषयी माहिती दिली आहे.
तसेच कॅप्शनमध्ये 'हसण्याचे आवडते कारण...' असे तिने नमूद केले आहे. चाहत्यांनी पोस्टखाली दोघांना पुन्हा शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच चाहत्यांनी अंकिताचे भरभरून कौतुक केले आहे. या पोस्टला २ लाखांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. आणि हजारोंच्या संख्येत कॉमेंट्स आहेत.