सासरे असावेत तर असे! ‘कन्यादान’फेम अभिनेत्रीची सासरेबुवांसाठी खास पोस्ट...
सन मराठीवरील ‘कन्यादान’ मालिकेमध्ये नवरा बायकोची भूमिका साकारणाऱ्या अमृता बने आणि शुभंकर एकबोटेचा एप्रिल महिन्यात विवाहसोहळा पार पाडला. यांच्या लग्नात इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. सध्या अमृता आणि शुभंकर सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यांचं चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, शुभंकरच्या वडिलांचा वाढदिवस… शुभंकर एकबोटे दिवंगत अभिनेत्री आश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे.
शुभंकरला आई नसल्यामुळे त्याला आईचंही आणि वडिलांचंही प्रेम त्याला वडिलांनीच दिले. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री अमृता बने हिने खास सासऱ्यांसाठी पोस्ट शेअर केली आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने खास पोस्ट लिहित कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहची उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला…
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमृताने लिहिलंय की, “आपण जन्माला आल्यावर कोणती माणसं आपल्या आयुष्यात येणार ह्याचा चॉईस आपल्याकडे नसतो. त्यामुळे माझ्या प्रारब्धात असलेली आणि देवाने फारच विशेष चॉईस करून पाठवलेल्या खास व्यक्तींमधली ही माझ्या आयुष्यातली खास व्यक्ती म्हणजे वासुदेव एकबोटे… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खासरेसासरे… आज जेव्हा मला सगळे म्हणतात की छान, मनमोकळे आणि ‘कूल’ आहेत तुझे सासरे तेव्हा एक पैसा भारी नक्कीच वाटतं पण त्यासोबत त्यांचं असं असण्यामागे देवाने चॉईस करून पाठवलेली माणसं यांना आपल्या आयुष्यात धरून आणि टिकवून ठेवण्यासाठी ते जे मानसिक, शारीरिक आणि वैचारिक कष्ट घेतात याचा खरच खूप हेवा वाटतो… असा सहज आणि सोपेपणा मला आणि शुभंकरला वारसा म्हणून मिळाला आहे त्यासाठी थँक यू Happiest Birthday to you again”
शुभंकर एकबोटेच्या कामाबद्दल सांगायचं तर तो, चिठ्ठी, मंत्र, डार्कलाईट, कन्यादान , चौक, धर्मवीर अशा चित्रपट मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अमृता बाणेबद्दल सांगायचं तर, तिने आपल्या करिअरची सुरुवात न्यूज रिपोर्टर म्हणून केली होती. त्यानंतर स्टार प्रवाहवरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेतून तिला देवी सरस्वतीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. रंग माझा वेगळा, जय जय स्वामी समर्थ या मालिकेतून ती भेटीला आली आहे.
Dhurandhar: रणवीर सिंग-आर माधवनचा ॲक्शन चित्रपटाचा खुलासा; या अभिनेत्याने शेअर केला फोटो!