
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजनसृष्टीत मानधनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अभिनेता शशांक केतकर याने त्याच्याबाबतीत झालेल्या अन्यायाची वाचा फोडली आहे. शशांकने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मालिका संपून पाच वर्षे झाली तरी मंदार देवस्थळींनी पाच लाख रूपये दिले नाहीत. गेल्या पाच वर्षापासून शशांक या गोष्टीचा पाठपुरावा करत असल्याचे पुरावेही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून मंदार देवस्थळी कारणं देत असून आज, उद्या पैसे देतो हेच सांगत आला आहे असं स्पष्ट शशांक केतकरने सांगितले. पैशांचा विषय काढला की तो रडतो, गयावया करतो. डार्लिंग, बाळा वगैरे म्हणतो. तो सतत थापा मारतो असं देखील शशांकने सांगितले आहे. ५ जानेवारी रोजी सेटलमेंट करणार असं मंदारने सांगितल्यानंतरही शशांकने पोस्ट केली होती की, आता जर फायनल पैसे मिळाले नाही तर मी आता कायदेशीर कारवाई करणार आहे, असे म्हणत शशांकने पोस्ट शेअर केली होती. त्याचबरोबर त्याने एक व्हिडिओ देखील शेअर करीत आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
शशांक केतकरनंतर अस्ताद काळेने देखील पोस्ट करत मराठी इडस्ट्रीतील सत्य उघड केले. आता शशांकच्या या पोस्टवर चाहते, तसेच अनेक कलाकार मंडळी त्याला पाठिंबा देताना दिसत आहे. यासोबतच काही कलाकरांनी त्यांच्याबरोबरही तसाच प्रकार घडल्याचे सांगितले आहे. शशांकने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक कलाकार मंडळी त्याला पाठिंबा देत आहे. ठरलं तर मग फेम अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी कमेंट करत शशांकला पाठिंबा दिला आहे. त्यांनी कमेंट्स करत लिहिले, ” मी तुझ्याबरोबर आहे. तू उत्तम करत आहेस.”
अभिनेता पार्थ घाडगेनेदेखील कमेंट्स करत म्हटलं आहे, मी अशाच परिस्थितीतून जात असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर संग्राम समेळने देखील कमेंट करीत साडेतीन लाख बाकी आहेत. टीडीएसबद्दल तर बोलायलाच नको. अंकिता वालावलकरने पती कुणाल भगतला टॅग करत लिहिले, ”तुझे पैसे कोणी बुडवलेत, त्यांची नावं मी इथे लिहू का?”
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)अभिनेता शशांक केतकरने शेअर केलेल्या पोस्टवर आता मराठी कलाकरांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. याबद्दल अभिनेत्री शिल्पा नवलकर काय म्हणाल्या पाहुया
शशांकने सर्वांच्या कमेंट्सला उत्तर दिले असून सगळ्यांनी बोललं पाहिजे, असे लिहिले आहे. कलाकरांबरोबरच आता चाहते ही शशांकला पाठिंबा देत आहे. एकाने कमेंट्समध्ये लिहिले, कष्टाचे पैसे आहेत. तू बरोबर बोललास अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या एकाने लिहिले, शशांक तुझं अगदी बरोबर आहे. कारण कामाचे पैसे तर मिळालेच पाहिजेत ? आणि आपल्या मेहनतीच्या पैशासाठी आपण भीक मागायची हे अत्यंत चुकीचं आहे. एकाने लिहिले, “या गोष्टी उघड पणे बोलता आल्या पाहिजे. माझ्या सारख्या क्रिएटर बाबतीत देखील असे अनुभव आले आहेत. “आता या सगळयावर मंदार देवस्थळी काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘Stranger Things 5’ या डॉक्यूमेंट्रीचा भावुक करणारा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या रिलीज डेट