दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहची उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला…
पंजाबी- बॉलिवूड गायक आणि सुपरस्टार दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लन नुकतंच भारतात झालेल्या कॉन्सर्टमुळे चर्चेत आहेत. ह्या दोन्हीही कलाकारांच्या कॉन्सर्टमध्ये हजारोंच्या संख्येने त्यांचे चाहते येत असतात. त्यानंतर या दोन्हीही गायकांच्या चाहत्यांमध्येही आणि त्यांच्यातही वाद सुरू झाला आहे.
नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टमध्ये एपी ढिल्लनने सांगितले की, दिलजीत दोसांझने त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले होते. यावर दिलजीतने असा काही प्रकार घडला नाही, असे उत्तर दिले. परंतु त्यानंतर एपी ढिल्लनने सोशल मीडियावर स्क्रीनशॉट्स शेअर केले होते, ज्यामध्ये दिलजीतने त्याला आधी ब्लॉक केले आणि नंतर अनब्लॉक केल्याचे दिसते. या दोन गायकांमधील वादात रॅपर बादशाहने सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
रणवीर सिंग-आर माधवनचा ॲक्शन चित्रपटाचा खुलासा; या अभिनेत्याने शेअर केला फोटो!
बादशाह शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतो की, “कृपयी आम्ही केलेल्या चुकांची पुनरावृत्ती तुम्ही करू नका. ही आमचे जग आहे. असं म्हणतात की, ‘जर तुम्हाला लवकर पुढे जायचं असेल तर एकटे जा, पण जर तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचा असेल तर एकत्र जा.’ एकत्र राहण्यातच खरी शक्ती आहे.”
अलीकडेच दिलजीत दोसांझचा इंदूरमध्ये कॉन्सर्ट झाला होता. यादरम्यान, दिलजीतने एपी ढिल्लन आणि करण औजलाला त्यांच्या कॉन्सर्टच्या भारत दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. दिलजीत म्हणाला की, “माझे आणखी दोन भाऊ एपी ढिल्लन आणि करण औजला यांनीही त्यांच्या कॉन्सर्टसाठी देशात दौरा सुरू केला आहे. ‘करण औजला आणि एपी ढिल्लन यांना खूप शुभेच्छा…’ देशात आता संगीत इंडस्ट्रीही स्वत:चे वेगळे स्थान प्रस्थापित करताना दिसत आहे.”
चंदीगडमधील आपल्या कॉन्सर्टमध्ये दिलजीत उत्तर देताना एपी ढिल्लन म्हणाला की, “मला तुम्हाला फक्त एक छोटी गोष्ट सांगायची आहे, भावा. आधी मला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक कर आणि मग बोल. मला कोणत्याही मार्केटिंगबद्दल बोलायचं नाही, पण आधी अनब्लॉक कर. मी गेली तीन वर्षं काम करतोय. तुम्ही मला कधी कोणत्याही वादात अडकताना पाहिलं आहे का?”
Fateh Trailer Out: ॲक्शनपॅक ‘फतेह’चा ट्रेलर रिलीज; सोनू सूद दिसला डॅशिंग अंदाजात!
इन्स्टाग्रामवर दिलजीतने एपी ढिल्लनला लगेचच रिप्लाय देत म्हणाला की, “मी तुला कधीच ब्लॉक केलेलं नाही. माझे वाद सरकारसोबत असू शकतात, पण कलाकारांसोबत नाही.”दिलजीतचा ‘दिल-ल्यूमिनाटी इंडिया टूर’हा दौरा २९ डिसेंबर २०२४ ला संपणार आहे. त्याचा हा दौरा कमालीचा वादग्रस्त ठरला आहे. तेलंगणामध्ये दिलजीतला कॉन्सर्टमध्ये मद्य, ड्रग्स किंवा हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या गाण्यांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचप्रमाणे, चंदीगडमधील त्याच्या कार्यक्रमासाठी आवाज मर्यादा उल्लंघनाबद्दल आयोजकांना नोटीस मिळाली होती.