‘विक्रम वेधा’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही राधिका आपली छाप सोडताना दिसत आहे. ‘विक्रम वेध’ हा चित्रपट पुढील महिन्यात ३० तारखेला प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कलाकारांनी चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे.
अलीकडेच या चित्रपटाचे काही कलाकार प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले होते. शो सुरू होताच होस्ट कपिल शर्माने सुरुवातीला सर्व कलाकारांचे स्वागत केले. यानंतर कॉमेडियनने आपला मोर्चा राधिका आपटेकडे वळवला. कपिलने राधिकाकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘अलीकडेच जेव्हा नेटफ्लिक्स भारतात आलं, तेव्हा मी तुझं इतकं पाहिलं की नंतर मला वाटलं की नेटफ्लिक्सचा लोगो तुझा चेहरा आहे. हे ऐकून सगळे हसायला लागले.’ कपिल पुढे म्हणाला, ‘इतकं काम करून सुद्धा तुला सबस्क्राईब करावंच लागेल’? राधिका म्हणाली नाही, ‘मलाही 600 रुपये द्यावे लागतील’. हे ऐकून उपस्थितांमध्ये पुन्हा हशा पिकला. शोमध्ये नंतर कपिलने सैफ आणि राधिकाला आठवण करून दिली की या दोघांनी यापूर्वी ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले होते.
‘विक्रम वेधा’ हा चित्रपट मूळ तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या रिमेकबाबतही अनेकजण उत्सुक आहेत. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा लूकही लोकांना आवडला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केले आहे.