कतरिना कैफचा करिअर ग्राफ कसा आहे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफला कोण ओळखत नाही? विकी कौशलशी लग्न केल्यापासून ही अभिनेत्री कमी चित्रपट करतेय, पण तिची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. बॉलीवूडची ‘चिकनी चमेली’ आज १६ जुलै रोजी तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.
हाँगकाँगमध्ये जन्मलेली कतरिना कैफला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून देण्यात सलमान खानचा मोठा हात आहे हे सर्वांना माहिती आहे. मुंबई शहराने तिचे नशीब बदलले आहे, पण एक काळ असा होता जेव्हा तिला दर दोन वर्षांनी देश बदलावा लागत होता. चला जाणून घेऊया यामागील कहाणी (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
दर दोन वर्षांनी देश बदलण्याचे कारण?
कतरिना कैफ आणि तिच्या ७ भावंडांना तिच्या आईनेच वाढवले आहे. अभिनेत्रीने स्वतः असेही सांगितले आहे की तिचे शिक्षणही घरीच झाले, ज्याला होम स्कूलिंग म्हटले जाते. ती कधीही शिक्षणासाठी शाळेत गेली नाही. तिच्या मुलांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी, कतरिनाची आई एका आंतरराष्ट्रीय चॅरिटी ट्रस्टमध्ये काम करायची. कतरिना स्वतः देखील या ट्रस्टशी संबंधित आहे. दैनिक भास्करमधील एका वृत्तानुसार, एका आंतरराष्ट्रीय चॅरिटी ट्रस्टशी संबंधित असल्यामुळे त्यांना दर दोन वर्षांनी देश बदलावे लागत होते.
14 व्या वर्षीच मॉडेलिंग सुरू
कतरिना कैफने वयाच्या १४ व्या वर्षी मॉडेलिंग सुरू केले. तिने पहिल्यांदा दागिन्यांच्या जाहिरातीसाठी रॅम्प वॉक केला. लंडनमध्ये एका मॉडेलिंग शो दरम्यान चित्रपट निर्माते कैजाद गुस्ताद यांची कतरिनावर नजर पडली. त्यानंतर त्यांनी ‘बूम’ चित्रपटासाठी तिला साइन केले. येथूनच कतरिनाने मुंबईत प्रवेश केला, ज्यामुळे तिचे आयुष्य बदलले. तथापि, हा चित्रपट फ्लॉप ठरला. नंतर सलमान खानच्या ‘मैने प्यार क्यूं किया’ चित्रपटाने कतरिना कैफचे नशीब पालटले.
कतरिनाचा करिअर ग्राफ
‘मैने प्यार क्यूं किया’ चित्रपटानंतर कतरिना कैफने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करायला सुरुवात केली. यानंतर तिला 2007 मध्ये ‘नमस्ते लंडन’ मिळाला आणि कतरिनाचे नशीब रातोरात चमकले. यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिच्या यशस्वी चित्रपटांमध्ये ‘टायगर’ सीरीज, ‘धूम 3’, ‘राजनीती’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘भारत’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ आणि ‘सूर्यवंशी’ यांचा समावेश आहे. तसंच चिकनी चमेली, शीला की जवानीसारख्या आयटम साँगनेही कतरिताला खूपच लोकप्रियता मिळवून दिली. सध्या कतरिनाचा कोणताही चित्रपट आलेला नाही. तर ती एक ब्युटी ब्रँड सांभाळत असून विकी कौशलशी लग्न झाल्यानंतर संसारात रमली असल्याचे दिसून येत आहे.
क्या अदा क्या जलवे तेरे…ट्रान्सपरंट साडी, बॅकलेस ब्लाऊज; सई अगं वेडंच व्हायचं बाकी आहे!