kiara latest photos
गेल्या अनेक दिवसापासून डॅान 3 चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या दोन्ही भागात अभिनेता शाहरुख खाननं कमाल करत प्रेक्षकांना अक्षरश: वेडं लावलं होतं. आता डॅान 3 चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हापासून चित्रपटाच्या स्टरकास्टबद्दल लोकांना उत्सुकता होती. काही दिवसापुर्वी चित्रपटातील मुख्य भुमिकेसाठी अभिनेता३ रणवीर सिंगचं (Ranveer Singh) नाव समोर आलं. मात्र, अभिनेत्रीच्या नावाची घोषणा करण्यात आली नव्हती. अखेर डॉन 3 चे निर्माते रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) यांनी काल एक मोठी घोषणा केली आणि चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज जाहीर केले. रणवीर सिंगच्या विरुद्ध बी टाऊनची आघाडीची अभिनेत्री फायनल झाली आहे.
[read_also content=”टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांच निधन, 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! https://www.navarashtra.com/movies/television-actor-ruturaj-singh-passes-away-at-the-age-of-59-due-to-cardiact-arrest-nrps-508712.html”]
बॉलिवूडचा प्रसिद्ध ॲक्शन-ड्रामा फ्रँचायझी चित्रपट ‘डॉन’ बद्दल चाहत्यांमध्ये उत्साह आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाविषयी काही ना काही अपडेट समोर येत होते. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी ‘डॉन 3’मध्ये रणवीर सिंगच्या एन्ट्री होणार असल्याचं सांगितलं होतं. आता निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटासाठी हिरोईन मिळाली आहे. डॉन 3 च्या मुख्य अभिनेत्री साठी अभिनेत्री कियारा अडवाणीच्या (Kiara Advani ) नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता प्रेक्षकांना कियारा आणि रणवीरमधील केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.रणवीर आणि कियारा दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत, असे म्हणता येईल की ही फ्रेश जोडी प्रेक्षकांवर त्यांची छाप सोडण्यासाठी सज्ज झाली आहे.
कियारा अडवाणीने या चित्रपटाचा भाग झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ‘डॉन 3’चा भाग झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
Thrilled to be part of the iconic Don franchise and to be working with this incredible team! Seeking all your love and support as we set out on this exciting journey together. ?@RanveerOfficial @FarOutAkhtar @ritesh_sid @PushkarGayatri @J10Kassim @roo_cha @vishalrr @excelmovies… pic.twitter.com/4oCbQSQwbc
— Kiara Advani (@advani_kiara) February 20, 2024