Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : तिसरी घंटा, नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; इचलकरंजीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन

येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 27, 2025 | 01:40 PM
Kolhapur : तिसरी घंटा, नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ; इचलकरंजीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन
Follow Us
Close
Follow Us:
  • तिसरी घंटा, नाट्यप्रेमींसाठी पर्वणी ;
  • इचलकरंजीत राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन
इचलकरंजी :  (प्र.) येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे 27 वे वर्ष असून सोमवार दिं 29 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, इत्यादी भागातील 37 संघांना प्रवेश देण्यात आलेला आहे. स्पर्धेचे परीक्षक या नात्याने प्रसिद्ध रंगकर्मी रावबा गजमल मुंबई, रवी इनामदार सातारा आणि गौरी लोंढे, पुणे हे जाणकार रंगकर्मी उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या दिवशी दि. 29 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात स्पर्धेची सुरुवात होईल. या दिवशी इन सर्च ऑफ (अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती, सांगली), आभाळाएवढी माया (सौ. मीनलताई शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी), प्लॅटफॉर्म (आजरा महाविद्यालय आजरा), पेंडुलम (कलासक्त मुंबई), कुणासाठी ? कशासाठी ? (चंदगडी कलाकार, चंदगड), तळ्यात मळ्यात (क्रिएटिव्ह कार्टी मुंबई), अशी ही दुनियादारी (थिएटर वर्कशॉप सातारा), खानदानी (पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट सातारा), म्हवं उठलाय (कारवा थिएटर, कोल्हापूर) एकांकिका सादर होतील.

मुंबईत टाळ्या शिट्ट्यानी दणाणला “संभवामि युगे युगे ” चा पहिला शो; परदेशातही सुरु आहे चर्चा!

दुसऱ्या दिवशीही एकांकिकांची रसिकांना मेजवाणी

दुसऱ्या दिवशी मंगळवारी दि. 30 रोजी फुलपाखरू (थिएटर मुव्हमेंट सातारा), वारी जावा (निर्मिती नाट्य संस्था, सातारा), अस्तित्व (संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), कौल (आनंदरंग कलामंच, सोलापूर), नथिंग टू से (चौंडेश्वरी कलापरिवार, इचलकरंजी), बोहाडा (मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे), काहीतरी अडकलंय (नाट्य आरंभ व मैगो एंटरटेनमेंट, पुणे), कॅलिडोरकोप (मधुमिलिंद रत्नागिरी), ग्वाही (देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर), उन्नीस सौ नब्बै (शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर) या एकांकिका होणार आहेत.

दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोने वेधले ‘बिग बॉस’ प्रेमींचे लक्ष

ओल्या भिंती, गुड फॉर नथिंग, पाकळ्या, घरघरचे सादरीकरण

बुधवारी 31 डिसेंबर रोजी मॅजिक मोमेंट (तुमचं आमचं, मुंबई), चिड्डी (रंगाविष्कार, ईश्वरपूर), होळी झाली (शहाजी विधी महाविद्यालय, कोल्हापूर), गुड फॉर नथिग (अमित देशमुख क्रिएशन, सातारा), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था, जयसिंगपूर), ओल्या भिती नियारा प्रयोगशाळा नियारा फाउंडेशन कोल्हापूर, काळ्या बंबाळ अंधारी (नाट्य शुभांगी, जयसिंगपूर), धरधर (प्रयोग कोल्हापूर), यात्रा (वननेस प्रोडक्शन ठाणे), पाकळ्या (नक्षत्र कला मंच मुंबई) या एकांकिकांचे सादरीकरण होईल.

नाट्य कलाकारांचा उत्स्फूर्त नाट्यविष्कार पाहण्याची संधी

समारोपाच्या दिवशी गुरुवारी 1 जानेवारी 2026 रोजी घबाड (डीकेएएससी कॉलेज, इचलकरंजी), प्रेम की यातना (वैभवदीप नाट्यसंस्था, सोलापूर), जेन-एक्स (हेरंब थिएटर्स सातारा), साठा उत्तराची कहाणी (नक्षत्र थिएटर्स सोलापूर), फिल्टर नसलेलं वास्तव (नाट्यकला अकादमी सातारा), हॉल तिकीट (वीणा स्टुडिओ कोल्हापूर), पाऊस पाड्या (लोकमान्य टिळक वाचनालय, बामणोली सांगली), नकाब (शब्दज, कोल्हापूर) आणि कुपन (रंगयात्रा, इचलकरंजी) या एकांकिका सादर होतील. स्पर्धेचा बक्षीस समारंभ याचवेळी सर्व सादरीकरण संपल्यानंतर होईल. सदरच्या मनोरंजन करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागातील नाट्य कलाकारांचा उत्स्फूर्त नाट्यविष्कार पाहण्याची संधी इचलकरंजी शहर तसेच परिसरातील नागरिकांना मिळणार आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही एकांकिका स्पर्धा कुठे आयोजित केली आहे?

    Ans: ही स्पर्धा इचलकरंजी येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आयोजित करण्यात आली आहे.

  • Que: या स्पर्धेचे आयोजन कोण करत आहे?

    Ans: ही स्पर्धा मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

  • Que: कोणकोणत्या जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले आहेत?

    Ans: कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, मुंबई, ठाणे आदी भागांतील संघ सहभागी झाले आहेत.

Web Title: Kolhapurichalkaranjit state level one act play competition organized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 01:38 PM

Topics:  

  • Entertainmenmt
  • kolhapur

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: भाकरी फिरणार अन् MVA तुटणार? ‘हा’ पक्ष बाहेर पडणार? तिसरी आघाडी…
1

Maharashtra Politics: भाकरी फिरणार अन् MVA तुटणार? ‘हा’ पक्ष बाहेर पडणार? तिसरी आघाडी…

Kolhapur Crime : आधी चाकूचा धाक दाखवला आणि मग… ; किणीजवळ खासगी बसवर दरोडा
2

Kolhapur Crime : आधी चाकूचा धाक दाखवला आणि मग… ; किणीजवळ खासगी बसवर दरोडा

हिमालयीन एअरलाईनचे साताऱ्यात लँडिंग! एव्हरेस्टवरून झेप घेणारा ‘पट्टेरी हंस’ सुर्याचीवाडीत दाखल; पक्षीप्रेमींची गर्दी
3

हिमालयीन एअरलाईनचे साताऱ्यात लँडिंग! एव्हरेस्टवरून झेप घेणारा ‘पट्टेरी हंस’ सुर्याचीवाडीत दाखल; पक्षीप्रेमींची गर्दी

Kolhapur News : “खेळ आठवणीतले गावाकडचे”; विद्यार्थ्यांना मैदानी खेळांची ओळख व्हावी यासाठी महाविद्यालयाचा खास उपक्रम
4

Kolhapur News : “खेळ आठवणीतले गावाकडचे”; विद्यार्थ्यांना मैदानी खेळांची ओळख व्हावी यासाठी महाविद्यालयाचा खास उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.