Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

36 भाषांमध्ये आवाज देऊन लता मंगेशकर बनल्या गानसम्राज्ञी, वयाच्या 11 व्या वर्षी गायनाला सुरुवात!

लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत एकट्या हिंदी भाषेतील 1000 हून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 06, 2024 | 03:55 PM
36 भाषांमध्ये आवाज देऊन लता मंगेशकर बनल्या गानसम्राज्ञी, वयाच्या 11 व्या वर्षी गायनाला सुरुवात!
Follow Us
Follow Us:

भारतीय चित्रपट, त्याचं संगीत आणि भारतीय संगीताची जगभरातील ओळख म्हणजे लता मंगेशकर! (Lata Mangeshkar) लता मंगेशकर म्हणजे एक प्रकारचे विद्यापीठ. ज्यात एकीकडे संगीत कला, गायन आणि पाश्वगायन कौशल्य होतं. त्यांनी त्यांच्या संगीताच्या कारकिर्दीत 36 भाषांमधील 50 हजाराहून अधिक गाण्यांना आवाज दिला. आज त्या आपल्यात नाहीत, पण त्यांचं संगीत क्षेत्रातील योगदान शतकानुशतकं स्मरणात राहील. लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत एक असा टप्पा गाठला आहे, ज्याची पुनरावृत्ती करणं कोणत्याही गायिकेसाठी फार कठीण असेल. लता मंगेशकर त्यांची आज दुसरी पुण्यतिथी. आजच्या दिवशी त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. जाणून घेऊया स्वरसम्राज्ञी लतादीदींचा संगीताचा प्रवास..

[read_also content=”‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ चा अंगावर काटा आणणारा टिझर रिलीज, पुन्हा एकाद अदा दिसणार दमदार भूमिकेत! https://www.navarashtra.com/movies/bastar-the-naxal-story-teaser-adah-sharma-plyaing-leaad-role-of-ips-officer-504939.html”]

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. त्याचं बालपण संघर्षानं भरलेलं होतं. 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी त्यांना गायन आणि अभिनयाच्या दुनियेत आणलं. पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. आपल्या भावा-बहिणींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी स्वतःला अभ्यासापासून दूर ठेवलं.

लतादीदींनी मराठी संगीत नाटकात काम केलं. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी मोठमोठे कार्यक्रम आणि नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये गाणी गायला सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीत लताजींनी एकट्या हिंदी भाषेतील 1000 हून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

भारतरत्न पुरस्काराने गौरव

लता मंगेशकरांनी संगीत क्षेत्रात एक अढळ असं स्थान निर्माण केलं आहे. कारकिर्दीत लतादीदींना आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने २००१ मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच आतापर्यंत ३ नॅशनल अवॉर्ड, पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि पद्मविभूषण हे पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे.  2007 मध्ये, फ्रेंच सरकारने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार (ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर) देऊन गौरव केला. याशिवाय, सप्टेंबर 2019 मध्ये त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारने त्यांना ‘डॉटर ऑफ द नेशन’ पुरस्कारानं सन्मानित केलं. आज लतादीदींच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देश त्यांची आठवण करत आहे.

Web Title: Lata mangeshkar death anniversary she gave voice to songs in 36 languages know about her music career nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2024 | 03:55 PM

Topics:  

  • Death Anniversary
  • entertainment
  • Lata Mangeshkar

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस
1

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
2

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.