‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं आपल्या आवाजाने महाराष्ट्रात घराघरात पोहचवणारे उत्तम गायक शाहीर साबळे (Shahir Sabale) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट महाराष्ट्र शाहीर लवकरच घरीूबसल्या पाहता येणार आहे. महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा वर्ल्ड विवार 18 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता आणि रात्री 9 वाजता प्रवाह पिक्चरवर या ट वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहता येणार आहे.
[read_also content=”‘वस्त्रहरण’ पुन्हा रंगभुमीवर येणार; सादर होणार ५ हजार २५५ वा प्रयोग! https://www.navarashtra.com/movies/vastraharan-marathi-natak-is-all-set-for-its-5225th-play-nrps-508144.html”]
अभिनेता अंकुश चौधरीने (Ankush Choudhary) च्या अभिनयानं नटलेल्या अंकुशनं मुख्य भुमिका साकारली आहे. संदर्भात बोलताना अंकुश चौधरी म्हणाला,”महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच चरित्रपटात काम केलं आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये शाहीर साबळेंचा मोलाचा वाटा आहे. आपल्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिवर सिनेमा बनणं आणि त्या सिनेमात आपल्यालाच त्या व्यक्तिची भूमिका साकारायला मिळणं यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. अशा या थोर कलावंताच्या आयुष्यावर बेतलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा घरबसल्या प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे याचा मनापासून आनंद आहे”.
‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचं दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केलं असुन त्यांची मुलगी सना शिंदेने (Sana Shinde) शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. यासोबतच निर्मिती सावंत, मृण्मयी देशपांडे, अश्विनी महांगडे, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते, अतुल काळे आणि दुष्यंत अशीही तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.