मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनेते मनोज यांच्या निधनावर शोक व्यक्त; म्हणाले, "चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान अमूल्य..."
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. त्यांची वयाच्या ८७ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. मुंबईतल्या धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची अवघ्या इंडस्ट्रीमध्ये देशभक्तीपर चित्रपटासाठी ओळख होती. राजकीय नेत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आणि काही उद्योगपतींनीही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
Idli Kadai: ‘इडली कडाई’ चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर, धनुषने नवे पोस्टरही केले शेअर!
चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. ‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून मनोजकुमार हे देशाला सुपरिचित झाले. त्यानंतर शेतीसारखा विषय त्यांनी चित्रपटातून हाताळला आणि ‘मेरे देश की धरती’ सारखे गीत आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला त्याच अभिमानाने ऐकले जाते. त्यांच्या ‘पुरब और पश्चिम’ सारख्या चित्रपटांनी तर जागतिक पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. ‘रोटी कपडा और मकान’ सारख्या चित्रपटांनी त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला.
उपकार, क्रांती असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. त्यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून देशप्रेमाची आणि राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणार नाही. मनोजकुमार यांनी दिग्दर्शन, पटकथा-गीत लेखन, संकलन या क्षेत्रातही काम केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कोट्यवधी चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
‘पुरुषांना आनंदी करण्यासाठी शारीरिक संबंध…’, लैंगिक संबंधाबद्दल लीना गुप्ता यांचं मोठं वक्तव्य
मेरे देश की धरती, ए वतन ए वतन हम को तेरी कसम, अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झाली, असे ज्येष्ठ निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक,अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे ‘भारतकुमार’ यांच्या निधनामुळे भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री म्हटले की, आपल्या अभिनय कारकिर्दीत ‘शहीद’, ‘पुरब और पश्चिम’, ‘हिमालय की गोद मैं’, ‘हरियाली और रास्ता’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ अशा विविध चित्रपटांत मनोजकुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या.
चित्रपटांमधून देशभक्ती, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसहित भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळलेले असून त्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीमधून लोकांना त्यांची जाणीव करून दिली. मनोजकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. भारतभूमीला वंदनीय मानणारा हा सच्चा कलावंत आज भारतभूमीच्या कुशीत कायमचा विसावला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Manoj Kumar Songs: मनोज कुमार यांची ५ सुपरहिट गाणी, जी अजूनही आहेत लोकांच्या ओठांवर