(फोटो सौजन्य - x अकाउंट)
‘पंचायत’ फेम नीना गुप्ताने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. आपल्या परखड आणि बोल्ड वक्तव्यांमुळे कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहणाऱ्या नीना गुप्तांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यांची जोरदार चर्चा होतेय. बोल्ड व्यक्तिमत्वामुळे ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता यांनी भारतातील महिला आणि त्यांचे शारीरिक संबंधाबद्दल असलेले विचार यावर बोल्ड वक्तव्य केलं आहे. हे वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीत केलं आहे. त्यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Manoj Kumar Songs: मनोज कुमार यांची ५ सुपरहिट गाणी, जी अजूनही आहेत लोकांच्या ओठांवर
नीना गुप्ता यांनी नुकतेच लिली सिंगच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारतीय महिला आणि सेक्सविषयी भाष्य केलं. मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, “पूर्वी सेक्स हा शब्द बोलताना मी फार कमी आवाजात बोलायचे. पण आता ती वेळ बदलली आहे. पण आता मला सेक्स शब्द बोलायला, कसलाही संकोच वाटत नाही. खरंतर, भारतात शारीरिक संबंधांना सर्वाधिक महत्व दिलं जातं. मला ९५ टक्के भारतीय महिलांसाठी फार वाईट वाटतं, कारण त्यांना माहिती नाही की सेक्स आनंदासाठी आहे. अनेक महिलांना असं वाटतं की, सेक्सची गरज फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी आणि आपल्या पतीला आनंदित ठेवण्यासाठीच आहे.”
व्यावसायिक नाटकांच्या निकालावर रंगकर्मीचा विरोधी सुर, नक्की कारण काय ?
मुलाखती दरम्यान पुढे अभिनेत्री म्हणाली की, “स्टुडिओत जेवढे लोक आहेत, तेवढेच आम्ही भारतात अल्पसंख्यांक आहोत. परंतु बहुतेक लोकांसाठी हे आनंददायक नाही. म्हणूनच ते खूप ओव्हररेट केलेलं आहे.” मुलाखती दरम्यान अभिनेत्रीला तिच्या वयाबद्दल प्रश्न विचारला होता. वयाबद्दल बोलताना नीना गुप्ता यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “मी ते कधीच सांगणार नाही की माझं वय काय आहे. कारण मी माझ्या वयापेक्षा फार तरुण दिसते. आधीच मला वृद्ध महिलांच्या भूमिका मिळतात, जर मी माझे वय उघड केले तर मला कोणकोणत्या भूमिका मिळतील, हे माहिती नाही. म्हणून प्रोफेशनल कारणांमुळे मी माझं वय सांगणार नाही…’ असंही नीना गुप्ता म्हणाल्या.
दरम्यान, नीना गुप्ता यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, त्यांनी १९८२ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नीना गुप्ता ह्या त्यांच्या फिल्मी करियरमुळे नाही तर, त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिल्या आहेत. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेल्या ‘पंचायत’ वेबसीरीजमुळे नीना गुप्ता यांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शिवाय नीना यांना ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरीजमध्येही काम केलं आहे. ‘बधाई हो’, ‘गुडबाय’, ‘वध’, ‘स्वर्ग’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘दर्द’, ‘मिर्झा गालिब’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता नीना गुप्ता यांच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत चाहते असतात.