Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“डोळ्यात पाणी आणून जागं करणारं अन्…”, सचिन खेडेकरांच्या ‘भूमिका’ नाटकाबद्दल हेमंत ढोमेची खास पोस्ट

मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत. ‘भूमिका’ नाटकाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 20, 2025 | 04:30 PM
"डोळ्यात पाणी आणून जागं करणारं अन्…", सचिन खेडेकरांच्या 'भूमिका' नाटकाबद्दल हेमंत ढोमेची खास पोस्ट

"डोळ्यात पाणी आणून जागं करणारं अन्…", सचिन खेडेकरांच्या 'भूमिका' नाटकाबद्दल हेमंत ढोमेची खास पोस्ट

Follow Us
Close
Follow Us:

मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत. त्यांच्या ह्या नाटकाचं नाव, ‘भूमिका’ असं असून सध्या ह्या नाटकाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं असून लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केलेलं आहे. सध्या या नाटकाचं कौतुक केलं जात आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने सचिन खेडेकरांचं ‘भूमिका’ नाटक पाहिलं. त्याने नाटक पाहिल्यानंतर ‘भूमिका’ नाटकाविषयी खास पोस्ट शेअर केलेली आहे.

मराठी पाऊल पडते पुढे! ‘या’ ४ चित्रपटांनी २०२५ च्या ‘कान्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मारली बाजी!

 

सचिन खेडेकर यांच्या ‘भूमिका’ नाटकाविषयी हेमंत ढोमेनं पोस्टर शेअर करत लिहिलेय की, “Ours is a battle, not for wealth nor for power. Ours is a battle for freedom, for reclamation of human personality! – Babasaheb Ambedkar… हा विचार खूप मोठा आहे आणि एका महामानवाने तो रुजावा यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं! इतरांसाठी, समाजासाठी आयुष्य वेचणारे आता घडत नाहीत हे तर खरं आहेच. पण, या विचारांची खुंटी बळकट करणारे देखील खूप कमी आढळतात… पण, पण, पण (हे म्हणताना मन अक्षरशः नाचतंय)

आजच्या या कठीण काळात जिथं माणूस स्वार्थी होत चाललाय, विचारांची बैठकच हरवून बसलाय त्या काळात रखरखीत उन्हात विचारांच्या सावलीचा आल्हाददायक गारवा देणारं एक भक्कम सशक्त नाटक तुम्हा आम्हा सगळ्यांच्या भेटीला आलंय…

डोळ्यात पाणी आणून आपल्याला जागं करणारं, विचार करायला भाग पाडणारं हे नाटक आपल्या जवळच्या माणसाने लिहिलं आहे, याहून जास्त अभिमानाची गोष्ट नाही! क्षितिज पटवर्धन या माझ्या अत्यंत हुशार लेखकाचं हे नाटक चुकवायचं नाही म्हणजे ते चुकवून चालणारंच नाही!

भंपक, सपक, गोडी गुलाबी वगैरे असल्या मनोरंजनाच्या मागे धावणाऱ्या या काळात हे नाटक भारतीय रंगभूमीवरचा मैलाचा दगड ठरणार यात तिळमात्रही शंका नाही!

डावं-उजवं-मधलं असं कुठलंही न राहता (तारेवरची अवघड कसरत करत) माणसाचं माणूसपण महत्त्वाचं हे पुन्हा एकदा अधोरेखित केल्याबद्दल क्षितिज आणि चंदू सरांसह संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार! क्या बात है क्षितिज मित्रा… असाच लिहीत रहा… आता जबाबदारी अत्यंत वाढलीय, आम्ही सगळे तुझ्याकडे आशेने पाहतोय… आता थांबायचं नाही! जी साथ लागेल ती कायम देत राहणार!

या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाचा जादूई नट, होय जादूईच! या नाटकात आहे जो हा सारा विचार आपल्या कानांना सुखावह करत थेट काळजात पोहोचवतो तो म्हणजे सचिन खेडेकर! आमच्या आवाक्याबाहेरचा आवाका आहे या नटाचा… speechless! लाजवाब अभिनय… लाजवाबच! मंडळी हा अभिनय तर कृपया चुकवू नका! कळकळीची विनंती आहे!

आजच्या काळात ‘भूमिका’ घेणारं चंद्रकात कुलकर्णी दिग्दर्शित हे नाटक कृपया लवकरात लवकर बघा!
या नाटकाच्या मागे भक्कपणे उभ्या असलेल्या निर्मात्यांचं विषेश कौतुक आणि आदर आणि संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन!

Proud… Proud… Proud!!!

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने दिला गोंडस मुलीला जन्म, लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर दिली गोड बातमी

Web Title: Marathi actor and director hemant dhome appreciated sachin khedekar marathi play bhumika

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • Plays
  • Sachin khedekar

संबंधित बातम्या

World Theatre Day 2025: शेक्सपियरच्याआधी 1900 वर्षांपूर्वीच भारतात रंगभूमीचा उगम, सनातन धर्मातील पाचवा वेद ‘नाट्यशास्त्र’
1

World Theatre Day 2025: शेक्सपियरच्याआधी 1900 वर्षांपूर्वीच भारतात रंगभूमीचा उगम, सनातन धर्मातील पाचवा वेद ‘नाट्यशास्त्र’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.