Actress Sharmishtha Raut Desai Blessed With Baby Girl
अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत (Sharmistha Raut) ही आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकाविश्वासह सिनेसृष्टीतही तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी शर्मिष्ठा राऊत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शर्मिष्ठा राऊत हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीच्या मुलीच्या बारश्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शर्मिष्ठाच्या लेकीच्या बारशाचे फोटो ‘राजश्री मराठी’ने शेअर करत तिने मुलीला जन्म दिल्याचे सांगितले.
Idly Kadai: धनुषच्या ‘इडली कढाई’ चित्रपटाच्या सेटवर भीषण आग; संपूर्ण सेट जळून खाक!
अभिनेत्री, निर्माती शर्मिष्ठा राऊतने लग्न कोरोना महामारीमध्ये केले. तेजस देसाईबरोबर शर्मिष्ठाने ऑक्टोबर २०२० मध्ये लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर आता शर्मिष्ठा आणि तेजसने लग्नाच्या साडे चार वर्षांनंतर आई-बाबा होत चाहत्यांसह आपल्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना सुखद धक्का दिला आहे. शर्मिष्ठा आणि तेजस आई- बाबा झाल्यानंतर खूपच आनंदीत आहेत. बारश्याच्या वेळी शर्मिष्ठा आणि तेजस या दोघांनीही मराठमोळा लूक करत सर्वांचेच लक्ष वेधलेय. शर्मिष्ठाने व्हाईट अँड रेड कलरची नऊवारी साडी तर तेजसने रेड कलरचा पैठणी स्टाईलचा कोट, व्हाईट कुर्ता आणि पायजमा वेअर केलेला होता. दोघांनीही एकमेकांना मॅचिंग लूक केलेला होता.
आलिया भट्टने केले आईचे कौतुक, Yours Truly मधील सोनी यांचा अभिनय पाहून झाली भावुक!
शर्मिष्ठा राऊतने आपल्या फिल्मी करियरमध्ये अभिनयासह निर्मितीची धुरा उत्कृष्टरित्या सांभाळली आहे आणि सांभाळत आहे. शर्मिष्ठाने साकारलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेतील नीरिजा, ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील प्रेमळ पण लगेचच चिडणारी अर्चना, उंच माझा झोका’ मधली आलवणातली ताई काकू, ‘सारं काही तिच्यासाठी’ मधली संध्या ह्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेत. ‘बिग बॉस मराठी’मध्ये तिची वाइल्ड कार्डद्वारे एन्ट्री झाली होती आणि त्यानंतर जबरदस्त खेळानं तिनं प्रेक्षकांची मनं जिकलं. ‘फु बाई फू’ मधून तिनं आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम केलं. सध्या तिची निर्मिती असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांना प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय शर्मिष्ठा चित्रपट निर्मितीही करताना दिसत आहे. या निर्मितीमध्ये तिच्याबरोबर तेजस जोडीला आहे.