'कधीतरी तुला पुढचा संकर्षण फोन करेल...' फोन कॉलवर जितेंद्र जोशीने अभिनेत्याला दिला मोलाचा सल्ला
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या ‘कुटुंब किर्रतन’ नाटकामुळे प्रचंड चर्चेत आहे. संकर्षणचं हे नवं कोरं नाटक रंगभूमीवर येत्या २१ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकाचा पहिला प्रयोग येत्या २१ मार्चला मुंबईमध्ये होणार आहे. माटुंग्याच्या ‘यशवंतराव नाट्यसंकुल’मध्ये चित्रपटाचा पहिला प्रयोग पार पडणार आहे. नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगांसाठी आगाऊ बुकिंगलाही सुरुवात झाली असून नाटकाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नाटकाच्या प्रदर्शनापूर्वी संकर्षणने अभिनेता जितेंद्र जोशीचे नाटकाच्या निमित्त आभार मानले आहेत.
RD Trailer: “आरडी” चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज, नव्या दमाच्या कलाकारांनी वेधलं लक्ष
संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट
“जितेंद्र जोशी …” आभार मानायला शब्दं नाहीत…
नाटकासाठीचा अत्यंत महत्वाची… नाटकापूर्वी रंगमंदिरात वाजते ती अनाऊन्समेंट…
“कुटुंब किर्रतन” नाटकाची अनाऊन्समेंट कुणी करावी कुणी करावी असं सुरू असतांना मनांत जितेंद्र जोशी हे नाव आलं… दामले सरांच्या कानावर घातलं तेही एका क्षणांत म्हणाले ड्डन…
सकाळी ११ वा. जितेंद्र जोशींना मी फोन केला म्हणालो दादा करशील का रे ?
आम्ही कधीच एकत्रं काम केलं नाही… भेटून शेक हॅंड सुद्धा आमचा कधी झाला नाहीये… पण, पलीकडून उत्तर… “मित्रा…… करीन की रे… ”
मी म्हणालो कधी वेळ मिळेल तुला ? उत्तर… आजच जातो…
लिहिलेली अनाऊन्समेंट पाठवली… त्यात मोलाची भर घालून जोशी बूवांनी जी काही रंगत आणलीये… ती तुम्हाला नाटकाच्या आधी ऐकायला मिळेल…
मी फोन ठेवतांना म्हणालो कसे आभार मानू…? उत्तर आलं… नकोच मानू… कधीतरी तुला पुढचा संकर्षण फोन करेल त्याला अशीच साथ दे… मी निःशब्दं…
काय बोलायचं… ??? नाटक धर्माला जागणारी ही वृत्ती शिकवून येत नाही…
मला खूपदा लोक विचारतात “तू मुंबईचा नाही… तुला लोकांनी कधी दूजाभाव करुन वागवलं का… ???” त्याचं हे उत्तर… मला ह्या शहरानं , माझ्या कामानं अशी माणसं दिली जी एका भेटीत एक ४०० पानांचं पुस्तक वाचल्याचा आनंद देतात…
मी हे कध्धीही विसरणार नाही…
“जितेंद्र जोशी…” तुम्ही कम्माल केलीत
विरळ केस अन् डोक्यावर टक्कल… पुष्कर जोगच्या नव्या लूकची सर्वत्र चर्चा…
दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, जितेंद्र जोशीसोबतच्या व्हिडिओ कॉलचे काही स्क्रिनशॉटही शेअर केले आहेत. दोन नाट्यकर्मींमधील झालेले हे संभाषण त्यांच्या चाहत्यांनीही उत्सुकतेने वाचले आणि त्यावर कमेंट सेक्शनमध्ये भरभरुन प्रतिसाद दिला आहे. चाहत्यांच्या असंख्य कमेंट्सचा वर्षाव संकर्षणच्या पोस्टवर आले आहे. ‘कुटुंब किर्रतन’ नाटकामध्ये प्रमुख भूमिकेत संकर्षणसह वंदना गुप्ते आणि तन्वी मुंडले आहेत.