काम मिळत नसल्याने मराठमोळ्या अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल; मित्र म्हणाला, "तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो..."
मराठी फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हाती काम नसल्यामुळे मराठमोळ्या अभिनेत्याने आणि दिग्दर्शकाने आत्महत्या केली आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिनही माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेला अभिनेता तुषार घाडीगांवकर याने आयुष्यामध्ये टोकाचं पाऊल उचललं आहे. तो ३२ वर्षांचा होता. तुषार याला काम मिळत नसल्यामुळे त्याने आत्महत्या केली आहे. अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त त्याचा मित्र आणि ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवे याने दिले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दु: खद बातमी दिली आहे.
यंदाचा योग दिवस अमृतासाठी ठरला खास; निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन साजरा केला खास दिवस
काही तासांपूर्वीच अभिनेता अंकुर वाढवेने तुषार घाडीगांवकरच्या निधनासंदर्भाची इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तुषारच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून अंकुरला धक्का बसला आहे. अंकुरने इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो पोस्ट करत आत्महत्या हा पर्याय नसल्याचं त्याने लिहिलं आहे. शिवाय अभिनेत्याने आपल्या खास मित्रासाठी भावुक कॅप्शनही दिलं आहे. “मित्रा का? कशासाठी? कामं येतात जातात, आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत. तुषार घाडीगांवकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो,” असं कॅप्शन देत अंकुरने तुषारचा फोटो शेअर करत लिहिलं आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत प्रसिद्ध सिने निर्मात्याचा मृत्यू, DNA टेस्टनंतर पटली ओळख
अंकुरने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, अंकुरची पोस्ट पाहता तुषारने हाती काम नसल्यामुळे इतकं टोकाचं पाऊल उचलल्याचं कळत आहे. तुषार मराठी इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होता. त्याने अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकेंमध्ये काम केले आहे. त्याने ‘मन कस्तुरी रे’, ‘लवंगी मिरची’, ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘हे मन बावरे’ आणि ‘झोंबिवली संगीत बिबट’ सारख्या अनेक कलाकृतींच्या माध्यमातून अभिनेत्याने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे.