Amruta Khanvilkar visits Kedarnath Temple to celebrate International Yoga Day
रोजच्या धावपळीच्या जीवनात फिट राहणं हे सगळ्यासाठी महत्वाचं आहे आणि अनेक कलाकार देखील फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसतात अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर ही फिट राहण्यासाठी योग करताना दिसते आणि तिच्या आयुष्यात योगाच खूप महत्त्व आहे हे आजवर तिने अनेक मुलाखती मधून देखील सांगितलं आहे.
जगभरात कुठेही ती फिरत असली तरी रोजच्या दिवसाची सुरुवात योग करून ती करते आणि यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस अमृताने एका खास ठिकाणी साजरा केला आहे. योगायोग म्हणजे अमृताची केदारनाथ ट्रीप आणि हा योग दिवस यांचा उत्तम योग जुळून आला असं म्हणणं वावग ठरणार नाही.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत प्रसिद्ध सिने निर्मात्याचा मृत्यू, DNA टेस्टनंतर पटली ओळख
केदारनाथच दर्शन घेऊन अमृताने हा योग दिवस अगदीच वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. तिचा फिटनेस मंत्रा हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. हा योग दिवस आणि केदारनाथ मंदिरात जाऊन घेतलेलं दर्शन या बद्दल बोलताना अमृता सांगते ….
“गेल्या काही वर्षांत योगाचा सराव करताना एक गोष्ट माझ्या हृदयात खोलवर उतरली आहे ती म्हणजे”Yoga is not just about movement of the body it’s equally about the stillness of the mind” शांतता आपल्याला अधिक समजूतदार बनवते आपले निर्णय घ्यायला आणि ते स्वीकारायला शिकवते आणि जे आपल्याला पुढे नेत नाही, त्याला सौम्यतेने सोडून द्यायचं धैर्य देते.”
‘सितारे जमीन पर’ चित्रपटातून आमिर खानचं जबरदस्त कमबॅक, पहिल्या दिवसाच्या कमाईचा आकडा आला समोर
“यंदा मात्र मनात वेगळीच ओढ होती… दैनंदिन सराव जितका महत्त्वाचा आहे. तितकंच अधूनमधून सर्व काही बाजूला सारून स्वतःसाठी एखादा अनुभव शोधायला निघणंही आवश्यक असतं. एक असा अनुभव जो आपल्याला अधिक खोलवर रुजवतो आणि माझ्यासाठी हा अनुभव म्हणजे — केदारनाथ यात्रा ! केदारनाथ यात्रेत खरी जादू तेव्हा घडली सकाळी साडेतीन वाजता, ब्रह्ममुहूर्तावर आम्हाला केदारनाथ मंदिरात दर्शन मिळालं!”
“बाहेर येऊन योगासन करत हा सुंदर क्षण अनुभवायला मिळणं अगदीच स्वप्नवत होत. प्रत्येकासाठी केदारनाथ वेगळं असतं. प्रत्येकाला भेटतो तिथे आपलाच एखादा जादुई क्षण. माझा क्षण मला मिळाला. आता तो क्षण मी माझ्यासोबत घेऊन परतले आहे माझ्या श्वासात, माझ्या साधनेत आणि माझ्या प्रत्येक शांत अस्तित्वात” अमृताने या यात्रेत फक्त केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही तर तिच्या योग साधनेचा एक नवा अध्याय तिने तिकडे जाऊन अनुभवला आहे.