Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वादळवाट फेम ज्येष्ठ अभिनेते डॉ विलास उजवणे यांचं निधन, वयाच्या 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vilas Ujwane passes away: मराठी मनोरंजन श्रेत्रातील दिग्गज अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 05, 2025 | 08:53 AM
वादळवाट फेम ज्येष्ठ अभिनेते डॉ विलास उजवणे यांचं निधन, वयाच्या 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वादळवाट फेम ज्येष्ठ अभिनेते डॉ विलास उजवणे यांचं निधन, वयाच्या 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us
Close
Follow Us:

जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन 4 एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी निधन झाले. त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. डॉ. विलास उजवणे यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा परसली आहे. मराठी मनोरंजन विश्वाने याप्रसंगी शोक व्यक्त केला आहे. नाट्य, मराठी कार्यक्रम, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून डॉ. विलास उजवणे यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र आता त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाने त्यांच्या मराठी मनोरंजनसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉ. विलास उजवणे यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

‘…माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी’ किरण माने यांची वडिलांसाठी मन हेलावणारी पोस्ट

मीरारोड याठिकाणी असणाऱ्या एका खासजी रुग्णालयात शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज शनिवारी 5 एप्रिल रोजी अभिनेते डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. विलास उजवणे यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. डॉ. उजवणे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विलास उजवणे आजारांशी झुंज देत होते. त्यांना सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यामुळे त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. ब्रेन स्ट्रोकचा सामना करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा त्रास देखील जाणवू लागला होता. शिवाय त्यांना कावीळची लागण देखील झाली होती. (फोटो सौजन्य – Facebook) 

मराठी मनोरंजनविश्वात डॉ. उजवणे यांचं कमबॅक

गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी असल्यामुळे अभिनेते डॉ. उजवणे यांच्याकडे कोणतं काम देखील नव्हतं. शिवाय आजारपणाच्या उपचारासाठी देखील त्यांचा मोठा खर्च झाला. मात्र त्यांनी या सर्वांवर मात करत पुन्हा त्यांच्या कामाला सुरुवात केली होती. त्यांनी पुन्हा त्यांच्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी मराठी मनोरंजनविश्वात कमबॅक केलं. ‘कुलस्वामिनी’, ‘२६ नोव्हेंबर’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

असा होता जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’ अशा मालिकांमधून डॉ. उजवणे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. त्यांच्या आगळ्यावेगळ्या अभिनय शैलीमुळे ते प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार बनले होते. डॉ. विलास उजवणे यांनी साकारलेल्या खलनायकांच्या भुमिका देखील गाजल्या आहेत. असे देखील अनेक प्रेक्षक आहेत ज्यांना डॉ. विलास उजवणे सकारात्मक भुमिकांपेक्षा खलनायकाच्या भुमिकेत आवडत होते.

अमोल कोल्हेंनी शेअर केली भावनिक पोस्ट

डॉ. विलास उजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या खडतर काळात मला अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. समोर आलेल्या आजारांचा त्यांनी अतिशय कणखरपणे सामना केला, या लढ्यात त्यांच्या पत्नी अंजली वहिनी यांनीही त्यांना खंबीर साथ दिली. ही झुंज अखेर थांबल्याने कला विश्वातील एक अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

‘तो मी नव्हेच…’ ऑनलाईन फसवणूक झालेल्या प्रकरणावर सागर कारंडेची पहिली प्रतिक्रिया…

अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या खडतर काळात मला अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. समोर आलेल्या आजारांचा त्यांनी अतिशय कणखरपणे सामना केला, या लढ्यात त्यांच्या पत्नी अंजली वहिनी यांनीही त्यांना खंबीर साथ… pic.twitter.com/oQNmv39LWF — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 4, 2025

Web Title: Marathi actor vilas ujwane passes away at the age of 62 entertainment news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actor

संबंधित बातम्या

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
1

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना
2

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट
3

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट

सिद्धांत चतुर्वेदी-त्रिप्ती डिम्रीचा ‘धडक 2’ नेटफ्लिक्सवर; चाहत्यांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
4

सिद्धांत चतुर्वेदी-त्रिप्ती डिम्रीचा ‘धडक 2’ नेटफ्लिक्सवर; चाहत्यांनी दिल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.