Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाट्यरसिकांसाठी सांगीतिक मेजवानी, ‘उर्मिलायन’नाटकाचा मुहूर्त पार पडला; पहिला प्रयोग केव्हा ?

‘उर्मिलायन’ हे नवं कोरं नाटक डिसेंबर महिन्यात रंगभूमीवर येत आहे. दिग्दर्शक कामेश मोदी यांच्या उपस्थितीत या नाटकाचा मुहूर्त ४ नोव्हेंबरला संपन्न झाला.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 06, 2024 | 03:36 PM
नाट्यरसिकांसाठी सांगीतिक मेजवानी, ‘उर्मिलायन’नाटकाचा मुहूर्त पार पडला; पहिला प्रयोग केव्हा ?

नाट्यरसिकांसाठी सांगीतिक मेजवानी, ‘उर्मिलायन’नाटकाचा मुहूर्त पार पडला; पहिला प्रयोग केव्हा ?

Follow Us
Close
Follow Us:

मनोरंजनातून काहीतरी चांगलं आणि वेगळं सुचवू पाहणारी नाटकं हे मराठी रंगभूमीचं बलस्थान राहिलं आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन ‘सुमुख चित्र’ निर्मित व ‘अनामिका’ प्रकाशित एक संगीत, नृत्यनाट्य आणि मनाच्या गाभाऱ्यात खोल शिरकाव करणारं ‘उर्मिलायन’ हे नवं कोरं नाटक डिसेंबर महिन्यात रंगभूमीवर येत आहे. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे डायरेक्टर कामेश मोदी यांच्या उपस्थितीत या नाटकाचा मुहूर्त ४ नोव्हेंबरला संपन्न झाला.

‘स्व’त्व म्हणजे आपले व्यक्तित्व, आपल्या अस्तित्वाची जाणीव. स्वत:ला ओळखता आले तर ‘स्व’त्व जपता येते. प्रत्येकाच्या अंतरंगातले चैतन्य जरी एकच असले तरी प्रत्येकाचा ‘स्व’ मात्र वेगळा असतो. याच ‘स्व’चा उहापोह करत इतिहासाच्या पानांमध्ये दडपल्या गेलेल्या स्वत्वाचे एक प्रतिक म्हणजे ऊर्मिला आणि त्या ऊर्मिलेचे ते आयन म्हणजे ‘उर्मिलायन’नाटक !

हे देखील वाचा – रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा ‘रामायण’ चित्रपट कधी रिलीज होणार ? दिग्दर्शकांनी शेअर केली डेट

स्त्री आणि पुरुष यांच्यातील श्रेष्ठत्वाची लढाई त्यांच्या एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, ‘स्वत्व’ जपूनही ‘स्व’ वर विजय प्राप्त करता येऊ शकतो का ? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आजही मिळू शकलेली नाहीत. कधी रुढीपरंपरांमुळे, तर कधी पुरूषप्रधान संस्कृतीच्या वर्चस्ववादामुळे आजही कळतनकळत ‘स्व’ची अवहेलनाच केली जाते. त्याला दुय्यम स्थान दिले जाते. अगदी सत्य, द्वापार , त्रेतायुगा पासून ते आजच्या कलीयुगापर्यंत हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडणाऱ्या या प्रश्नांचा उहापोह करणाऱ्या ‘उर्मिलायन’ या नाटकाचा रंगमंचीय अविष्कार प्रत्येकाने आवर्जून अनुभवायला हवा. याची निर्मिती सुमुख चित्रचे कार्यकारी निर्माता निखिल जाधव हे करीत आहेत.याचे लेखक दिग्दर्शक आहेत सुनिल हरिश्चंद्र आणि नेपथ्य अरुण राधायण यांनी केले आहे, संगीत निनाद म्हैसाळकर यांनी दिले आहे तर वेशभुषा मंदार तांडेल यांनी केली आहे. यातील प्रमुख कलावंत आणि इतर तंत्रज्ञ सध्या गुलदस्त्यात आहेत. ज्यामुळे एकूणच या नाटकाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार आहे हे नक्की !

हे देखील वाचा – “त्या व्यक्तीने गोळी लागलेली असतानाही उठून…” कंगना रणौतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी लिहिली खास पोस्ट

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक विजय निकम आणि लेखक, अभिनेता,दिग्दर्शक, समीक्षक, नाट्यप्रशिक्षक अरुण कदम यांनीही या नव्या नाटकाला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. ‘उर्मिलायन’ सारखे नाटक रंगमंचावर करायला जिगर लागते,धाडस लागते,हे शिवधनुष्य कार्यकारी निर्माते निखिल जाधव यांनी ऊचलले याचे खूपच कौतुक वाटते असं सांगत आता हे नाट्यपुष्प लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी आपली जबाबदारी ओळखून त्याच जबाबदारीने प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचे मत विजय निकम यांनी बोलून दाखविलं. नाटकाची नाळ संगीताशी बांधलेली असून,त्याचा ताल नृत्यांवर आधारीत आहे;त्यामुळे एकाच नाटकात नवरसांचे नेत्रदिपक पारणे फेडणारे रंग ‘उर्मिलायन’ नाटकाला नक्कीच वेगळा आयाम देईल असा विश्वास अरुण कदम यांनी व्यक्त केला.

Web Title: Marathi drama urmilayan muhurta at today when and where watch this drama

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 03:36 PM

Topics:  

  • marathi actress
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
1

राजकीय मैदानात मराठी अभिनेत्री; लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.