रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा 'रामायण' चित्रपट कधी रिलीज होणार ? दिग्दर्शकांनी शेअर केली डेट
रणबीर कपूरच्या मोस्ट अवेटेड ‘रामायण’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केलेली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारींनी इन्स्टाग्रामवरून चित्रपटाची रिलीज डेट शेअर केलेली आहे. दिग्दर्शकांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केलेला असून चित्रपट दोन पार्टमध्ये रिलीज होणार असल्याची माहितीही मिळत आहे. दिग्दर्शक दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट रिलीज करणार आहे. जाणून घेऊया रणबीर कपूरच्या मोस्ट अवेटेड ‘रामायण’ चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल…
दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माते नमित मल्होत्रा यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता अधिक ताणली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना दिग्दर्शक म्हणतात, “हे महाकाव्य एका दशकापूर्वी रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. आज त्या छोट्याच्या गोष्टीचा चित्रपटात रुपांतर झाल्याने मला फार आनंद होत आहे. आपला इतिहास आणि त्यातील सत्यता आणि आपली संस्कृती… जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे एक उद्दिष्ट आहे.” निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी रामायण चित्रपटाचे एक नाही तर दोन भाग येणार आहे अस जाहीर केलं आहे. हे प्रेक्षकांसाठी मोठं सरप्राईज असल्याचं मानलं जात आहे. या रामायण चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
रणबीर कपूर, साई पल्लवी, आणि यश यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार असून ‘केजीएफ’ फेम यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, अरूण गोविल राजा दशरथाची भूमिका साकारणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता कैकयीची भूमिका साकारताना दिसणार आहे.