Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मराठी पाऊल पडते पुढे’चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न,  5 मे रोजी होणार. सिनेमा रिलीज

मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईतील दादर क्लब येथे गुरूवारी 13 एप्रिल रोजी आयोजित करण्याता आला होता. जेष्ठ विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संगीत प्रकाशित करण्यात आले. त्याप्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री. सुरेश हावरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

  • By शिल्पा आपटे
Updated On: Apr 19, 2023 | 06:36 PM
‘मराठी पाऊल पडते पुढे’चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न,  5 मे रोजी होणार. सिनेमा रिलीज
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Paul Padate Pudhe : मराठी पाऊल पडते पुढे (Marathi Paul Pdate Pudhe) ह्या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईतील दादर क्लब येथे आयोजित करण्याता आला होता. जेष्ठ विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संगीत प्रकाशित करण्यात आले. त्याप्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री. सुरेश हावरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

“मराठी माणूस हा केवळ नोकरीत रमणारा नाही तर व्यवसायात उतरून नोकऱ्या देणारा होऊ शकतो आणि ह्या महाराष्ट्रात केवळ आणि केवळ मराठी माणसाचाच डंका वाजला पाहीजे, असे वातावरण हा चित्रपट निर्माण करेल, अशी आशा असल्याचं मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ निर्माता प्रकाश बाविस्कर आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या सोबत आहे, अशी ग्वाही श्री. सुरेश हावरे यांनी दिली. मराठी पाऊल पडते पुढे या शीर्षकातच मराठी माणूस सुध्दा प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत आहे, हे स्पष्ट होते. निर्माते प्रकाश बाविस्कर हे सुध्दा एक व्यवसायिक आहेत. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी लिहिलेल्या कथेमध्ये व्यवसायाऐवजी मराठी माणूस नोकरीला जास्त महत्व देतो. पण, काही मोजक्या व्यक्तीच व्यवसायाकडे वळतात. त्यावेळी मात्र नायकाला इतर प्रस्थापित व्यावसायिकांकडून त्रास होतो,  हे प्रस्थापित व्यावसायिक राजकीय मंडळी व अधिकारी यांच्याशी अभद्र युती करुन येन केन प्रकारे उभरत्या व्यवसायिकांना त्रास देतात. त्याविरोधात नायक करीत असलेला संघर्ष, त्याची व्यावसायिक मानसिकता, सचोटी व अडचणीतून मार्ग काढण्याचा रोख कसा असावा? हे चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे.

“आयुष्यात सहजासहजी काहीच मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. मी जेव्हा 1993 बॉम्बस्फोट खटल्यानिमित्त मुंबईत आलो. तेव्हा बॉम्बस्फोट खटला हा एक संघटीत गुन्हेगारीची केस होती त्यामुळे ह्या एवढ्या मोठ्या शहरात आपला निभाव लागेल का? अशी माझ्या मनात भिती होती. पण, जिद्द आणि संघर्षाचं व्रत घेतलं आणि यशस्वी झालो. मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट मराठी तरुणांना संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा आहे, याची मला खात्री झाली. आयुष्य हे बागडण्याचे क्रीडांगण नसून प्रतिकूल परिस्थितीत झुंज देण्याचं रणांगण आहे, हा संदेश ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल. संगीतही श्रवणीय आहे. शीर्षकगीत मनाला प्रेरणा देणारे आहे. आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली होऊ शकत नाही. पण, संघर्ष करण्याची प्रेरणा देतो आणि हीच प्रेरणा मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटातून मिळेल, असा मला विश्वास आहे. निर्माते प्रकाश बावीस्कर हे माझ्या जिल्ह्यातील आहेतच पण माझे चांगले मित्रही आहेत, मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.” असे गौरवोद्गार विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी चित्रपटाच्या संगीत प्रकाशन सोहळ्यादरम्यान सांगितले.

अकात फिल्म्सचे चंद्रकांत विसपुते हे चित्रपटाचे सहनिर्माते असून स्वप्निल मयेकर यांनी लेखन दिग्दर्शन केले आहे. मराठी पाऊल पडते पुढे हया चित्रपटात प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील आहे. ‘गोव्याच्या किनाऱ्यावर…’ ह्या म्युझिक अल्बमच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सिद्धी पाटणे प्रमूख भूमिकेत आहे. ‘मराठी पाउल पडते पुढे’ हया चित्रपटाद्वारे चिराग आणि सिद्धी ही जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. यांच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय कुलकर्णी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गीतकार रेश्मा कारखानीस, किरण पाटील, कृपेश पाटील आणि प्रवीण माळी यांच्या गीतरचनांना संगीत दिग्दर्शक समीर खोले यांनी संगीतबदध केले आहे. त्यावर स्वप्निल बांदोडकर, धनंजय सरतापे, निमिषा बाविस्कर, मयूरा खोले आणि प्रवीण माळी यांनी स्वरसाज चढवला आहे. पहिल्यांदाच या सिनेमात अहिराणी गाणी ऐकायला मिळणार आहेत,

Web Title: Marathi paul padate pudhe cinema music release nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2023 | 06:36 PM

Topics:  

  • marathi cinema
  • Ujjwal Nikam

संबंधित बातम्या

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
1

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने जुई गडकरी झाली भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द
2

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली
3

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली

Jyoti Chanderkar: कधी आणि कुठे होणार ज्योती चांदेरकर यांचे अंत्यसंस्कार? मुलगी तेजस्विनी पंडितने दिली माहिती
4

Jyoti Chanderkar: कधी आणि कुठे होणार ज्योती चांदेरकर यांचे अंत्यसंस्कार? मुलगी तेजस्विनी पंडितने दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.