“उद्या यांची पोरं विदेशात असतील अन्...”,नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत
नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरच्या मुद्द्यावरुन मोठ्या प्रमाणावर दंगल झाली. १७ मार्चला अर्थात सोमवारी काही संतप्त जमावाने जोरदार दगडफेक आणि जाळपोळ केली. महाल परिसरामध्ये झालेल्या या दंगलीमध्ये पोलिसांवर देखील हल्ला करत दगडफेक करण्यात आली. यामध्ये 34 पोलीस जखमी झाले आहेत. तर एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग देखील झाला असल्याचे दिसून आला आहे. या प्रकरणाचे वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. अशातच मराठी फिल्म इंडस्ट्रीतूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनंतर ‘बिग बॉस मराठी ३’ फेम उत्कर्ष शिंदेनेही प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्याच दिवशी कोटींची कमाई करणार ‘सिकंदर’? सलमान खानच्या ‘या’ चित्रपटाचे मोडेल रेकॉर्ड?
कायमच सामाजिक- राजकीय मुद्द्यांवर आपलं परखड मत मांडणाऱ्या गायक उत्कर्ष शिंदेने नागपूरमधील दंगलीच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीसंदर्भात आता उत्कर्षने कविता लिहीत नागरिकांना शांतता-संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. “दंगल करू नका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील” असं अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अभिनेत्री करूणा वर्माच्या घरातून लाखोंचे दागिने चोरीला; पोलिसांकडून तपास सुरू
उद्या ह्यांची पोर विदेशात असतील
दंगल करू नाका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील
ना शिक्षण, नोकरी, घर ना पैसा ना मान सन्मान
फक्ता कोर्टाच्या पायऱ्या दिसतील
दंगल करू नाका मित्रांनो
तुमच्या नावावर फक्त केसेस असतील
कस होइल बहिणीचं लग्न – नरक होईल बायकोच जगण
कस कराल आईच म्हातारपण- कस कराल बापाच कार्य
हाथ रिकामा खिसे रिकामे-खिशात दमडी नसतील
उद्या ह्यांची पोर विदेशात असतील
दंगल करू नाका मित्रांनो तुमच्या नावावर फक्त केसेस असतील
जन्म जगण्या साठी आहे
राजकारण्यांच्या त्या वार्ता नको
तुम्हीच सांगा तुमच्या घराला
पुरूष कोणी करता नको ?
विचार करा भविष्याचा पिढ्या अंधारात बसतील
तुमी ठिक तर घरचे आनंदित तुमच्या नेहमी असतील
दंगल करू नाका मित्रांनो तुमच्या नवावर फक्त केसेस असतील
गरीबीत राहा- स्वाभिमानाने जगा
तर लोक तुम्हाला पुसतील
जाति भेद भाषा प्रांत ह्याने होइल सारा अशांत
समाज कंठक बनून रहाल -पोलीस घरत घुसतील
करावस ही भोगल तुम्हीच -तेव्हा कोणी सोबत नसतील
उद्या ह्यांची पोर विदेशात असतील
दंगल करू नाका मित्रांनो तुमच्या नवावर फक्त केसेस असतील
-डॉ उत्कर्ष आ शिंदे
देवन्हावे येथे रंगला ‘खेळ महिलांचा उत्सव आनंदाचा’
दरम्यान, उत्कर्ष शिंदेच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.