occasion of International Womens Day the 'khel mahilancha utsav anandacha' program was organized by Shraddha Sakhra
संगीत खुर्ची, ग्रुप डान्स, प्रश्न मंजूषा अशा फनी गेम्सची रेलचेल असलेला ‘खेळ महिलांचा उत्सव आनंदाचा’ या महिला दिनानिमित्त कार्यक्रमाला देवन्हावे (ता. खालापूर) येथे महिलांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. अभिनेत्री साक्षी गांधी या कार्यक्रमचे खास आकर्षण ठरल्या. झी मराठी दुरचित्रवाणी वाहिनी यांच्या वतिने आणि खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक महिला दिनानिमित्त देवन्हावे (ता. खालापूर) येथील विनायकराव चौधरी रंगमंच समोरील मैदानात ‘खेळ महिलांचा उत्सव आनंदाचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे यांनी केले होते. सहकुटुंब सह परिवार या मालिकेतील अवनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री साक्षी गांधी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढली.
या कार्यक्रमात झी मराठी वाहिनीच्यावतीने महिलांसाठी फनी गेम्स स्पर्धा देखील घेण्यात आल्या. फनी गेम्स स्पर्धेतील महिलांनी आकर्षक बक्षिसांची देखील रेलचेल होती. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना श्रद्धा साखरे यांच्या हस्ते आकर्षक भेट वस्तू देखील यावेळी देण्यात आल्या. देवन्हावे ग्रुप ग्रामपंचायत परिसरातील महिलांनी या कार्यक्रमाला उत्फुर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाला खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे, देवन्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि युवानेते अंकित साखरे, देवन्हावे ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्ना वाघमारे, नितीन चौधरी, संजयमामा कडाव, अविनाश पाटील, भगवान पाटील आदी उपरस्थित होते.
सत्य आणि अन्यायाच्या संघर्षात कोण जिंकेल? ‘राख’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…
जागतिक महिला दिनानिमित्त ‘खेळ महिलांचा उत्सव आनंदाचा’ या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले होते. ग्रामीण भागातील महिलांना मनोरंजन आणि आनंद व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील कलागुण जपता यावेत, कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला देवन्हावे ग्रुप ग्रामपंचायत परिसरातील महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. असं खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रद्धा साखरे असं म्हणाल्या.
खरंतर इतक्या दूर येऊन देखील थकवा जाणवला नाही. कारण येथील महिलावर्गातील उर्जा मला देखील एक उर्जा देऊन गेली. महिला दिन नुकताच झाला असला तरी प्रत्येक दिवस हा महिलांचाच दिवस असतो. श्रद्धाताई साखरेंनी अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले. महिलांसाठी असे प्रोत्साहन देणारे कार्यक्रम व्हायला हवेत. अशा कार्यक्रमात महिला उत्साहाने कार्यक्रमात सहभागी होतात. हाच उत्साह कायम रहावा, असे कार्यक्रम नेहमी व्हावेत या शुभेच्छा, सहकुटुंब सह परिवार फेम अभिनेत्री साक्षी गांधी असं म्हणाली.