Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका! ८० मराठी सिनेकलाकार ‘डोंबिवलीकर चषक’मध्ये भिडणार

डोंबिवलीत चाहत्यांना क्रिकेटचा महासंगम पाहायला मिळणार आहे. ‘डोंबिवलीकर चषक’मध्ये ऐकून ८० मराठी कलाकार सहभागी होताना दिसणार आहेत. ज्याची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 02, 2025 | 01:28 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका
  • ८० सिनेकलाकार ‘डोंबिवलीकर चषका’मध्ये सामील
  • ‘डोंबिवलीकर चषका’ची संपूर्ण टीम
 

डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तब्बल ८० हून अधिक लोकप्रिय कलावंत एका मैदानावर उतरणार असून दोन दिवस हा रोमांचक क्रिकेटचा संग्राम रंगणार आहे. मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग (MCCL) अंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे सामने ६ आणि ७ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून या स्पर्धेचं आयोजन डोंबिवलीकर संस्थेने केले आहे. हा उपक्रम संपादक, आमदार रविंद्र चव्हाण, (प्रदेशाध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश) यांच्या डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवाराच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे.

यंदाच्या चषकचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी घडवणाऱ्या ८ दिग्गज महानुभावांना आदरांजली म्हणून त्यांच्या नावाने संघ बनवण्यात आले आहेत. पहिला संघ निळू फुले संघ असून त्याचा कॅप्टन सिद्धार्थ जाधव आहे. या टीममध्ये नुपूर दुधवाडकर, वरद चव्हाण, ऋषिकेश पाटील, तेजस बर्वे, सुप्रीत कदम, शिव ठाकरे, ऋतुजा लिमये, ऋतुजा कुलकर्णी असणार आहेत.

ऋषभची नक्कल रणवीरला पडली भारी! चाहत्यांची मागितली माफी, म्हणाला ‘मी नेहमीच परंपरा, संस्कृती…’

तर, दुसरा भालजी पेंढारकर संघ आहे. त्याचा कॅप्टन हार्दिक जोशी असून त्याच्या टीममध्ये ऋतुराज फडके, आकाश पेंढारकर, अमोल नाईक, नचिकेत लेले, सौरभ चौगुले, रोहित शिवलकर, कीर्ती पेंढारकर, धनश्री काडगांवकर आहेत. दादासाहेब फाळके संघाचे संजय जाधव कॅप्टन असून माधव देवचक्के, सुजय डहाके, आदिश वैद्य, प्रदीप मिस्त्री, विजय आंदळकर, जगदीश चव्हाण, जयंती वाघधरे, नम्रता प्रधान त्यांच्या टीममध्ये आहेत.

चौथा संघ रंजना संघ असून तितिक्षा तावडे त्याची कॅप्टन आहे. तिच्या संघात सिद्धार्थ बोडके, आशिष कुलकर्णी, प्रणव रावराणे, प्रसाद बर्वे, गौरव घाटणेकर, उमाकांत पाटील, शांतनु भाके, अमृता रावराणे यांचा समावेश आहे. तर पु. ल. देशपांडे संघाचे कॅप्टन प्रवीण तरडे असून त्यांच्या संघात अभिजीत कवठाळकर, अजिंक्य जाधव, सागर पाठक, विराट मडके, चिन्मय संत, अंशुमन विचारे, राधा सागर आहेत. सहावा संघ दादा कोंडके संघ असून प्रथमेश परब त्याचा कॅप्टन आहे. तर या संघात विजय पटवर्धन, पृथ्वीक प्रताप, गौरव मोरे, रोहन मापुस्कर, विशाल देवरुखकर, कृणाल पाटील, मयुरी मोहिते, संजना पाटील आहेत.

Tejaswini Lonari Video: तेजस्विनीची लगीनघाई! हातावर रंगली समाधान सरवणकरांच्या नावाची मेहंदी, पाहा फोटो

व्ही. शांताराम संघाचे कॅप्टन विजू माने असून संदीप जुवाटकर, विनय राऊळ, सुमित कोमुर्लेकर, अभिजीत चव्हाण, महेश लिमये, ओमप्रकाश शिंदे, प्राजक्ता शिसोदे, गौरी इंगवले या संघात आहेत. अखेरचा संघ भक्ती बर्वे संघ असून अनुजा साठे त्याची कॅप्टन आहे. या संघात सौरभ गोखले, वैभव चव्हाण, हर्षद अटकरी, अंगद म्हसकर, अक्षय वाघमारे, आनंद काळे, विशाल निकम, रिया राज सहभागी आहेत.

दोन दिवस डोंबिवलीत फक्त क्रिकेट, उत्साह, कलाकारांची धमाल आणि मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे. मैदानावर कलाकारांची फिल्डिंग, बॅटिंग, चौकार-षटकारांचा वर्षाव आणि एकमेकांमधील मैत्रीपूर्ण टक्कर हे सर्व प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देणार आहे. प्रत्येक संघ आपल्या नावाशी जोडलेल्या महान दिग्गजांना सन्मान देत मैदानावर उतरणार असल्याने स्पर्धेला भावनिक आणि सांस्कृतिक रंगही मिळणार आहे. ही सर्वात मोठी मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग ठरणार असून ‘डोंबिवलीकर चषका’ची ही रोमांचक लढत प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय पर्व ठरेल, यात शंकाच नाही.

Web Title: 80 marathi artists to participate in dombivalikar chashak cricket league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actor
  • Marathi News

संबंधित बातम्या

ऋषभची नक्कल रणवीरला पडली भारी! चाहत्यांची मागितली माफी, म्हणाला ‘मी नेहमीच परंपरा, संस्कृती…’
1

ऋषभची नक्कल रणवीरला पडली भारी! चाहत्यांची मागितली माफी, म्हणाला ‘मी नेहमीच परंपरा, संस्कृती…’

शरद पवारांचा नातू अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रिणीसोबत थाटला संसार; पाहा Photos
2

शरद पवारांचा नातू अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रिणीसोबत थाटला संसार; पाहा Photos

‘इंद्रायणी’ मालिकेत नवा ट्विस्ट; श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात? इंद्रायणीच्या वाढणार अडचणी
3

‘इंद्रायणी’ मालिकेत नवा ट्विस्ट; श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात? इंद्रायणीच्या वाढणार अडचणी

Bigg Boss 19 : मिडिया राउंडमध्ये तान्या मित्तलची पत्रकारांनी जिरवली!  राम नावाने घरातील वातावरण तापले…
4

Bigg Boss 19 : मिडिया राउंडमध्ये तान्या मित्तलची पत्रकारांनी जिरवली! राम नावाने घरातील वातावरण तापले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.