Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेच्या सेटवर हृदयस्पर्शी घटना, मंजूच्या काळजीपोटी थेट साताऱ्यात पोहोचले ८४ वर्षीय आजोबा!

‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. तसेच या मालिकेत मंजूला गोळी लागल्याचा प्रसंग दाखवण्यात आला. हा सीन पाहून चक्क ८४ वर्षांचे आजोबा मंजूच्या काळजीपोटी थेट सेटवर पोहचले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 26, 2025 | 07:00 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ ने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेने केवळ महिलांचं किंवा तरुणांचंच नव्हे, तर वयोवृद्ध प्रेक्षकांच देशील मन जिंकले आहे. याच संदर्भात एक जिवंत उदाहरण नुकतंच मालिकेच्या सेटवर पाहायला मिळाले आहे. सध्या मालिकेत सत्या निवडणुकीत विजयी झाला असून, विजयानंतरच्या मिरवणुकीत मंजूला गोळी लागते आणि तिची प्रकृती गंभीर होते. हा एपिसोड पाहून अनेक प्रेक्षक भावूक होताना दिसले आहेत. मंजूला गोळी लागल्याच्या प्रसंगाने ८४ वर्षांचे दत्तू कर्णे यांच्या मनात इतकी अस्वस्थता निर्माण झाली की, त्यांनी घरात कोणालाही न सांगता सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी गावातून थेट साताऱ्यात पोहोचले. आणि मंजूची विचारपूस केली आहे.

बिग बॉस फेम ‘हे’ प्रसिद्ध कपल लग्नाच्या ३ वर्षानंतर होणार वेगळे? अभिनेत्रीने केला खुलासा

आजोबांनी सातारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं – “मंजू कशी आहे? ती बरी आहे ना?” त्यांच्या चेहऱ्यावरून मंजूबद्दल काळजी, प्रेम, आपुलकी, आणि तीव्र भावना स्पष्ट जाणवत होत्या. साताऱ्यातील पोलीस उप निरीक्षक अशोक सावंजी, कॉन्स्टेबल अनिल सावंत यांनी या आजोबांच्या भावना समजून घेत, त्यांना ‘कॉन्स्टेबल मंजू’च्या सेटवर नेण्याची विशेष व्यवस्था केली. सेटवर पोहोचताच आजोबांनी अभिनेत्री ‘मंजू’ म्हणजेच मोनिका राठीचा हात पकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सत्याला आईच्या चुकीसाठी थेट सुनावलं आणि इतर कलाकारांनाही खरीखुरी पात्रं समजून स्पष्ट शब्दांत आपली मतं मांडली. हा क्षण इतका भावूक होता की, संपूर्ण युनिटच्या डोळ्यांत पाणी आले.

याचदरम्यान, आजोबा घरच्यांना न सांगता निघून गेल्यामुळे त्यांचं कुटूंब काळजीत होत. आजोबा साताऱ्या पोलीस स्टेशन मध्ये पोहोचताच पोलिसांनी दत्तू कर्णे यांच्या कुटुंबाला ते साताऱ्या मध्ये असल्याचे कळवल. मात्र, मालिकेच्या टीमने त्या गोष्टीची तत्काळ दखल घेतली, आजोबांशी प्रेमपूर्वक संवाद साधला आणि त्यांना आदरातिथ्यासह सुखरूप घरी परत पाठवण्याची व्यवस्था केली. या भावस्पर्शी घटनेबाबत अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की, “मंजू या पात्राला मिळणारं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही. मला गोळी लागली म्हणून ८४ वर्षांचे आजोबा थेट सेटवर आले, हे आमच्यासाठी धक्कादायक आणि अतिशय भावूक होतं.” असे अभिनेत्री म्हणाली.

रजनीकांतच्या ‘Coolie’ चित्रपटातील ‘चिकीतू’ गाण्याची क्रेझ; काही मिनिटातच केले लाखोंचे व्ह्यूज पार

तसेच, पुढे म्हणाली की, ‘सोशल मीडियावर प्रेक्षक नेहमी प्रतिक्रिया देतात, पण प्रत्यक्ष कोणीतरी, तेही एवढ्या वयात, एवढा मोठा प्रवास करून, केवळ मालिकेतील पात्राची काळजी घेऊन पोहोचतो ही फारच मोठी गोष्ट आहे. त्यांनी माझा हात धरून माझ्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या डोळ्यांतली काळजी पाहून आम्ही सारे भारावून गेलो. हेच खरं यश आणि कलाकार म्हणून सर्वात मोठं समाधान आहे. ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका आज फक्त एक कथा न राहता, मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयाशी नाळ जोडली आहे. मालिकेतील पात्र, प्रसंग, आणि भावना इतक्या जिवंतपणे पोहोचत आहेत की, प्रेक्षक त्यात गुंतून जात आहेत, त्यात जगू लागले आहेत. प्रेक्षकांचं हे निखळ प्रेम पाहता  ‘सन मराठी’ आणि ‘कॉन्स्टेबल मंजू’च्या संपूर्ण टीमसाठी खऱ्या अर्थाने सर्वात मोठा पुरस्कार आहे.” असे तिने म्हटले आहे.

Web Title: A heart touching incident on the sets of the marathi serial constable manju old grandfather reach satara from solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 07:00 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.