
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गेल्या काही भागांपासून “कमळी” मालिकेत एका मोठ्या वळणाची सुरुवात झाली आहे. कामिनी आणि नयनतारा यांनी कमळी विरुद्ध एक कट रचला आहे, ज्यामुळे कमळी आणि ऋषी यांच्यातील यांच्यात दुरावा येईल की काय असं वाटत असतानाच, कामिनीने प्राजक्तावर होणाऱ्या छळाचा व्हिडिओ ऋषीच्या फोनमध्ये पोहोचवून गंभीर वातावरण केलं आहे. पार्टीनंतर दोघेही एकमेकांशी संवाद थांबवतात, पण ऋषीच्या मनात अजूनही कमळीसाठी प्रेमाची भावना आहे. याच दरम्यान, नयंताराच्या जबरदस्तीमुळे ऋषी आणि अनिकाचा साखरपुडा ठरवला जाणार आहे. ऋषीच विरोध असतानाही नयनतारा निर्णय बदलत नाही. या सगळ्यात कमळीला काहीतरी चुकीचे घडत असल्याचं जाणवत त्यामुळे ती या कटामागचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. या सगळ्यामुळे साखरपुडा रद्द होणार का ? इकडे अन्नपूर्णा आज्जीने हरवलेल्या नातीचा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि याच दिवशी ऋषी कमळीला प्रपोज करायचं ठरवतो.
आता ऋषी आपल्या मनातल्या भावना कमळीला सांगू शकेल ? अनिका या अपमानाचा कसा सूड घेईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
“कमळी” ही झी मराठीवरील एक लोकप्रिय मराठी मालिका आहे, जिने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा मिळवली आहे. या मालिकेत मुख्य पात्र कमळी नावाची एक उत्साही आणि धाडसी मुलगी आहे, जिने शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करण्याचे स्वप्न पाहिलेले आहे. तिचा संघर्ष आणि सामाजिक भेदभाव, अडचणी यांचा सामना करत ती आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, हे या मालिकेचे मुख्य कथानक आहे. मालिकेतील प्रमुख कलाकारांमध्ये विजया बाबर मुख्य भूमिकेत आहे, तर निखिल दामले आणि केतकी कुलकर्णी यांचे महत्त्वाचे पात्र आहेत.
‘कमळी’ मालिकेने एक काही महिन्यांपूर्वीच नवीन इतिहास रचला होता. झी मराठी वाहिनीवरील ही मालिका आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिने थेट न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकून जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे.झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक खास व्हिडिओ शेअर होता ज्यामध्ये ‘कमळी’ मालिकेचा प्रोमो न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर मोठ्या LED स्क्रीनवर झळकत असल्याचे स्पष्टपणे दिसते.