(फोटो सौजन्य - x अकाउंट)
संगीत विश्वातली 20 वर्ष साजरी करत असताना प्रसिद्ध गायक अभिजीत एका मागोमाग एक प्रेक्षकांना सुखद धक्के देताना दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी “चाल तुरु तुरु” सारख्या जुन्या गाण्याची नवी मैफिल जमवत त्याने प्रेक्षकांना मोहित केले आणि आता तो पुन्हा प्रेक्षकांना नव्या गाण्याचं खास सरप्राईज देण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिजीतने नुकतेच एक नवे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. इंडियन आयडॉल पासून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचून अभिजीतने सगळ्यांची मन जिंकली आणि तेव्हापासून सुरू झालेला हा संगतिक प्रवास आजही तितकाच अविरत पणे सुरू आहे.
अभिजीतने आजवर अनेक कमालीची गाणी केली आहेत अश्यातच तरुणाई पासून अगदी लहानग्या पर्यंत त्याच्या गाण्याची आवड सगळ्यांना आहे. आता अभिजीत काय नवीन घेऊन येणार आहे या बद्दल चर्चा असताना त्याने काही नव्या लूक्सचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले होते आणि जे चांगलेच चर्चेत होते आता या फोटो मागचं खरं कारण समोर आले आहे. तसेच नव्या गाण्यामधील अभिजीतचा लूक चांगला दिसत आहे.
नवीन ढंगातील ‘चाल तुरु तुरु’च्या यशानंतर आता अभिजीत नव्या सुरात प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याचा मोहक आवाजानं लाखो रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. अभिजीत सावंत याने अनेक वेगवेगळे संगीतमय प्रोजेक्ट्स केले आणि अजूनही तो नवनवीन प्रयोग करत आहे. ‘पैसा थेंब थेंब गळं’ हे खास गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आले असून पुन्हा त्याच्या आवाजाची जादू प्रेक्षकांनी अनुभवयाला मिळाली आहे.
अभिजीत या नव्या गाण्याबद्दल सांगताना तो म्हणाला, ‘ “पैसा थेंब थेंब गळं” हे नवं गाणं प्रेक्षकांना नक्कीच प्रेक्षकांना आवडेल आणि हे गाणं सुद्धा एक फ्युजन साँग आहे. दादा कोंडके यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीचं सुपरहिट गाणं असलेल्या “ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं” या गाण्याचा हे खास फ्युजन आहे. गाण्यामधला वेगळेपणा जपून त्यांना थोडा मॉर्डन तडका देऊन आम्ही हे गाणं केलं आहे. थोडं रॅप थोडं जुन असा काहीसा अंदाज असलेले हे नवं गाणं देखील ट्रेंड होईल अशी आशा आहे’, असे तो म्हणाला. अभिजीतची आजवर अनेक गाणी ट्रेंड झाली प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ठरली आता नवीन गाणं किती धुमाकूळ घालणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.