
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘देवों के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ अशा लोकप्रिय मराठी आणि हिंदी मालिकांमधून तसेच चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या प्रचंड आनंदात आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने नुकतंच आपल्या सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर तिने मायानगरी मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर भाग्यश्रीने आपलं स्वप्न पूर्ण करत, चाहत्यांनाही या आनंदात सहभागी करून घेतलं.
भाग्यश्रीने आपल्या नव्या घरातील गृहप्रवेशाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्या फोटोंमध्ये ती पारंपरिक साडी परिधान करून विधीवत पूजा करताना दिसते. घरात लक्ष्मीपूजनाचा सोहळा साजरा करण्यात आला असून, यावेळी तिच्या कुटुंबीयांसह काही जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
या पोस्टमध्ये भाग्यकश्रीने एक खास कॅप्शन लिहिलं आहे,”स्वप्नपूर्ती;सुमारे १४ वर्षांपूर्वी मी मुंबईत येणा जाना सुरू केला त्यावेळी राहायला जागा नसल्या कारणाने एका दिवसात येऊन, ऑडिशन्स देऊन, भेटीगाठी करून पुण्याला परत जावा लागायचा. आणि आजचा दिवस आहे ह्या स्वप्ननगरीच्या शहरात माझा हक्काचा घर झालय. बाळ तू हवी होतीस, तुझी खूप आठवण येतीये, तुझ्या इतकं आनंदी आज दुसरा कोणी नसतं आणि तो आनंद बघण्याचा नशीब मला लाभला असता, असो असशील तिथे तू खूप खूश रहा आणि माझा अभिमान बाळगत असशील हे तर मला माहितीच आहे. खूप कृतज्ञ आहे, सगळ्यांनी इतकं प्रेम दिला, साथ दिली. खूप खूप धन्यवाद आणि आभार. माझ्यावरचा प्रेम आणि समर्थन असंच राहू द्या”
संस्कृती बालगुडेचा ‘कृष्ण’ अवतार सोशल मीडियावर व्हायरल, नवीन प्रोजेक्टची झलक की खास फोटोशूट?
असं कॅप्शन देत तिने आपला आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टवर अनेक मराठी कलाकरांनी देखील तिला अभिनंदन केलं असून चाहत्यांनी तिच्यावर आनंदाचा वर्षाव केला आहे.
२०२५ हे वर्ष अनेकांसाठी खास ठरलं आहे. कोणी नवी गाडी घेत तर कोणी हक्काचं खरेदी करत स्वप्न साकार केलं. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक कलाकारांचीही स्वप्नपूर्ती झाल्याची पाहायला मिळाली. अनुजा साठे, प्रियांका तेंडोलकर तसेच अभिनेता गंधार खरपुडीकर या मराठी कलाकारांनी हक्काची इच्छा पूर्ण झाली.