Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: आयआयटी प्रकाशित करणार मुंबई लोकलवरील अहवाल, अनेक महत्त्वाच्या बाबींनी वेधलं लक्ष

लोकलचा एकुणच अभ्यास करण्याचे काम मुंबई रेल्वे विरास महामंडळाने (एमआरव्हीसी) आयआयटी मुंबईला दिले. गर्दीमुळे लोकलमधून पडून आणि रुळ ओलांडताना होणाऱ्या मूत्युची संख्या जास्त आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 25, 2026 | 02:13 PM
Mumbai News: आयआयटी प्रकाशित करणार मुंबई लोकलवरील अहवाल, अनेक महत्त्वाच्या बाबींनी वेधलं लक्ष

Mumbai News: आयआयटी प्रकाशित करणार मुंबई लोकलवरील अहवाल, अनेक महत्त्वाच्या बाबींनी वेधलं लक्ष

Follow Us
Follow Us:
  • इंडियन इन्स्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) शुक्रवारी प्रकाशित करणार अभ्यास अहवाल
  • मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरुन दररोज सुमारे ६८ ते ७० लाख प्रवासी प्रवास करतात
  • सार्वजनिक वाहतूकीसाठी महामुंबईत एकात्मिक तिकीट प्रणाली राबवण्यात येतेय
मुंबई: मुंबईच्या उपनगरीय लोकलला दरवर्षी ३ हजार कोटीचा तोटा कमी करण्यासह वाहतूक क्षमता वाढविणे, देखभालीसाठी कोणत्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. लोकलची क्षमता वाढविणे, एसी लोकलच्या तिकिट दराची पूर्नरचना, तोटा कमी करण्यासाठी उपाय, लोकलचे वेळापत्रक यासह अनेक बाबींवरील अभ्यास अहवाल इंडियन इन्स्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) शुक्रवारी प्रकाशित करणार आहे.

Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरुन दररोज सुमारे ६८ ते ७० लाख प्रवासी प्रवास करतात. लोकल मुंबईकरांची लाईफलाईन आहे. वेगवान, किफायतशीर प्रवासाकरिता लोकलला पहिली पसंती आहे. सकाळी-संध्याकाळच्या पीक अवरच्या वेळी लोकलला प्रचंड गर्दी असते. गर्दीमुळे लोकलमधून पडून आणि रुळ ओलांडताना होणाऱ्या मूत्युची संख्या जास्त आहे. त्यातच लोकलच्या तिकिटात गेल्या अनेक वर्षांपासून बदल झालेला नाही. तिकिट जास्त असल्याने सामान्य प्रवासी आजही एसी लोकलने प्रवास करत नाहीत.

मध्य, पश्चिम लोकल टप्प्याटप्याने होणार एसी

लोकलचा एकुणच अभ्यास करण्याचे काम मुंबई रेल्वे विरास महामंडळाने (एमआरव्हीसी) आयआयटी मुंबईला दिले. महामुंबईतील रेल्वे मार्गाचा विस्तार करणे, नवे रेल्वे मार्ग उभारणे, रेल्वे प्रकल्पांना अर्थपुरवठा करणे अशी मुख्य जबाबदारी एमआरव्हीसीची आहे, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात टप्याटप्याने सर्व लोकल एसी होत आहेत. एसी लोकलची खरेदी, गाड्या, चालवण्याचा खर्च, प्रवासी उत्पन्न यांच्या विश्लेषणाच्या माध्यमाने व्यवहार्य आर्थिक मॉडेल तयार करण्यात येत आहे. रेल्वे, मेट्रो, बेस्ट अशा सर्व सार्वजनिक वाहतूकीसाठी महामुंबईत एकात्मिक तिकीट प्रणाली राबवण्यात येत आहे. त्याच्या व्यवहार्यता तपासणीचे काम अहवालात केले आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

Chandrapur News: सत्तासंघर्ष चिघळला! एकाला महापौर, दुसऱ्याला स्थायी समिती सभापती? धानोरकर–वडेट्टीवार वाद थेट दिल्ली दरबारी

लोकल विस्तारानंतर प्रवाशांना मिळणार दर्जेदार सुविधा

भविष्यात सुरू होणाऱ्या मेट्रो आणि लोकलच्या विस्तारानंतर प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळवण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीचे टप्पे, आवश्यकतेनुसार वेळापत्रकात बदल, पायाभूत सुविधाची उभारणीच्या कालबद्ध शिफारसी आयआयटी एमआरव्हीसीला करणार आहे.

  • मुंबई प्रवाशांची मागणी, भाडे, खर्च आणि पायाभूत सुविधांवरील आव्हानांचा अभ्यास
  • भविष्यातील धोरण आणि गुंतवणूक निर्णयांना मार्गदर्शन
  • १६ पेपर्सच्या या संशोधनात अनेक व्यापक आयामांचा अभ्यास
  • ट्रेनचा वापर, वक्तशीरपणा, मालमत्तेचा वापर, देखभाल पद्धती, कर्मचारी भरती पद्धती आणि ऊर्जेचा वापर यांचे मूल्यांकन
  • टर्मिनल क्षमतेच्या मर्यादा, सिग्नलिंग मर्यादा आणि टर्नअराउंड वेळा यासह विद्यमान नेटवर्कमधील अडथळ्यांचा विचार

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Iit to release report on mumbai local trains key findings draw attention mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • Local Trains
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
1

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.